Is fasting good for body: पोट हा शरीराचा एक महत्त्वाचा आणि आवश्यक भाग आहे. असे मानले जाते की, जर पोट निरोगी असेल, तर अर्ध्याहून अधिक आजार स्वतःहून बरे होतात. परंतु, आजकालच्या व्यग्र आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे पोटाशी संबंधित आजार सर्व वयोगटांतील लोकांसाठी एक समस्या बनली आहे. भूक न लागणे, गॅस, आम्लता, अपचन व पोट फुगणे या सामान्य समस्या बनल्या आहेत. पण, तुम्हाला माहीत आहे का? या सर्व समस्या सोडविण्यासाठी एक सोपी पद्धत सर्व आजार दूर करण्यास मदत करू शकते.

हा सोपा, पण प्रभावी उपाय म्हणजे उपवास. उपवासात काही तास उपाशी राहणे आरोग्यासाठी एक औषध आहे. पोटाशी संबंधित आजार मर्यादित काळासाठी औषधांच्या मदतीने व्यवस्थापित केले जाऊ शकतात; परंतु काही काळानंतर औषधांची प्रभावीतादेखील कमी होते. म्हणून उपवास शरीराला आतून स्वच्छ करण्याचा एक मार्ग आहे, जे कोणतेही औषध करू शकत नाही. उपवास पोट खोलवर स्वच्छ करतो, पचनसंस्थेला बरे करण्यास मदत करतो आणि शरीराला स्वतःला दुरुस्त करण्याची संधी देण्याची प्रक्रिया आहे.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, उपवास कसा करायचा? तर तुम्ही दर आठवड्याला किंवा दर १५ दिवसांनी एकदा उपवास करून सुरुवात करू शकता. त्यात तुम्ही एकादशीचा उपवास करू शकता. कारण- ती महिन्यातून दोनदा येते. उपवासाच्या सुरुवातीला फक्त ऊर्जा देणारी फळे खा. त्याव्यतिरिक्त शक्य तितके मध पाणी, नारळ पाणी प्या. पाणी शरीरातील सर्व अशुद्धता बाहेर काढण्यास मदत करते.

उपवास केल्याने अशक्तपणा जाणवतो?

काही लोकांना असे वाटते की, उपवास केल्याने अशक्तपणा जाणवतो; परंतु हा आपल्या एक गैरसमज आहे. कारण- शरीराला अन्नातून फक्त ३० ते ४० टक्के ऊर्जा मिळते; उर्वरित ऊर्जा पाणी, हवा व विश्रांती यांतून मिळते. त्यामुळे उपवासाने अशक्तपणा जाणवेल, असा विचार करणे चुकीचे आहे. जपानी शास्त्रज्ञांनीही उपवासावर संशोधन केले आहे. २०१८ मध्ये केलेल्या संशोधनानुसार, उपवास शरीराला वाईट पेशी काढून टाकण्यास आणि नवीन व निरोगी पेशी तयार करण्यास मदत करतो. या प्रक्रियेला ऑटोफॅगी म्हणतात.

उपवास करण्याचे आणखी काही फायदे

पचनसंस्थेला विश्रांती

सतत खाल्ल्यामुळे पचनसंस्था थकते. तुम्ही जर दर आठवड्याला किंवा महिन्यातून दोन वेळा उपवास केलात तर तुमच्या पचनसंस्थेला विश्रांती मिळते. त्यामुळे गॅस, अॅसिडिटी, अपचन कमी होते.

शरीराची आतून स्वच्छता

उपवासात शरीर जुन्या, खराब पेशी नष्ट करून नवीन पेशी तयार करते. त्याला Autophagy म्हणतात. त्यामुळे
वृद्धत्वाचा वेग मंदावतो आणि कॅन्सरसारख्या आजारांचा धोका कमी होतो.

इन्सुलिन लेव्हल संतुलित होते

सतत खाण्याने इन्सुलिन वाढते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो; परंतु उपवासात इन्सुलिन कमी होते, मधुमेह नियंत्रणात राहतो आणि शरीर चरबी कमी करते.

हृदयाचे आरोग्य सुधारते

उपवासामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते आणि रक्तदाब नियंत्रित राहतो, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.