Post COVID-19 Diet : कोविड संक्रमणामुळे शरीराचे बरेच नुकसान होते. इतके की या आजारातून बरे झाल्यानंतरही कित्येक महिने याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. तसेच कोविड आपल्या शरीराला इतकं नुकसान पोहचवत आहे की त्यातून बाहेर येणे शक्य नाही. पोस्ट कोविड रिकव्हरीबद्दल बोलायचं झाल्यास लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. काही लोकांना बऱ्याच काळापासून थकवा जाणवत आहे तर काहींना भूक न लागणे, केस गळणे यासारख्या समस्या उद्भवत आहेत. अशा स्थितीत योग्य आहार न घेणे या समस्या वाढवू शकतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतरही ६८ दिवस दिसू शकतात लक्षणे

संशोधनानुसार अनेकदा रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतरही ६८ दिवस लक्षणे कायम राहतात. कोविडमधून बरे झाल्यानंतरही शरीर पहिल्यासारख्या स्थितीत यायला बराच वेळ लागतो. यासाठी चांगला आहार आणि योग्य जीवनशैली अंगीकारणे आवश्यक आहे. नाहीतर कोविडमधून बरे झाल्यानंतरही थकवा आणि अशक्तपणा राहू शकतो. अशा वेळी तुमची हरवलेली ऊर्जा परत मिळवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

Pregnancy Tips : करोना काळात प्रेग्नन्सी प्लॅन करताय? तर ‘या’ गोष्टींची नक्की काळजी घ्या

>> कोविडमधून बरे झाल्यानंतर काही महिने बाहेरचे अन्न खाणे टाळा. बाहेरचे अन्न शिळे असू शकते. त्यामध्ये अनेक प्रकारचे रंग, केमिकल किंवा भेसळयुक्त पदार्थ असू शकतात, जे तुम्हाला रिकव्हरी स्टेजमध्ये हानी पोहोचवू शकतात.

>> बंद पाकिटातील अन्न खाऊ नये. जास्त काळ टिकवण्यासाठी त्यात भरपूर प्रिझर्व्हेटिव्ह आणि केमिकल्स टाकले जातात. हे प्रक्रिया केलेले पदार्थ तुम्हाला खूप नुकसान देऊ शकतात.

>> कुकीज, केक, चॉकलेट्स, कार्बोनेटेड पेये, प्रक्रिया केलेले फळांचे रस किंवा भरपूर साखर असलेल्या गोष्टी खाऊ नका. कोविड दरम्यान दिलेल्या औषधांमुळे अनेकांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढली आहे. अशा परिस्थितीत जास्त साखर असलेल्या गोष्टी खाणे खूप हानिकारक ठरू शकते.

>> घरातील हलके अन्नच खा. डालडा, तळलेले अन्न, समोसे इत्यादी ट्रान्स फॅट असणारे पदार्थ खाणे टाळा. जे अन्न सहज पचते तेच खा. तसेच अन्न ताजे असल्याची खात्री करा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dont eat these things after recovering from covid19 can cause huge damage pvp
First published on: 24-01-2022 at 14:04 IST