Healthy Cooking Oils: बरेच लोक कुकिंग ऑइल खाणे टाळतात किंवा जेवणात तेलाचा अगदी कमी वापर करतात. जेवणात तेलाचा अतिवापर केल्याने, आरोग्यास हानिकारक मानले जाते. जास्त तेलाच्या सेवनाने वेगवेगळे आजार उद्भवू शकतात. मात्र, तेल बऱ्याच वेळ सोडल्याने शरीरावर होणाऱ्या वाईट परिणामाबद्दल तुम्ही ऐकलंय का? होय, खाद्य तेल अचानक खाणे सोडल्याने शरीरावर त्याचे परिणाम होऊ शकतात. त्यामुळे अशावेळी कोणते तेल खावे आणि त्याचा वापर किती प्रमाणात असावा हे जाणून घेतलं पाहिजे. तेल अचानकपणे सोडल्याने देखील आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जाणून घ्या की, कोणत्या तेलाचा जेवणात वापर करावा आणि कोणत्या तेलाचा करू नये.

तेल का आवश्यक आहे?

अनेक तेलांमध्ये ओमेगा ३ असते, जे आपले शरीर स्वतः तयार करू शकत नाही. म्हणून ते अन्न स्त्रोतांकडून मिळवणे आवश्यक आहे. तेलामध्ये चांगले फॅट्स असतात, जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. प्रत्येक गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो असे म्हणतात आणि तेच तेलांनाही लागू होते. स्वयंपाक करताना किंवा तळलेले पदार्थ नियमितपणे खाण्यामध्ये जास्त तेल वापरल्याने वजन तर वाढतेच पण ते तुमच्या आरोग्यासाठीही हानिकारक आहे. त्यामुळे तेलाचा कमी तसंच मर्यादित वापर केल्यास, हे तेल आरोग्यासाठी चांगले आहे.

Health Benefits of Avocado
झपाट्याने वजन कमी करणारे हिरव्या रंगाचे ‘हे’ फळ कापण्यापूर्वी स्वच्छ धुवा; तज्ज्ञ म्हणतात, अन्यथा पडेल महागात
printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
Vote From Home Eligibility and Procedure for Lok Sabha Election 2024 in Marathi
Vote From Home: घरबसल्या मतदान करण्यासाठी कोण पात्र? त्यासाठीचा फॉर्म 12D नेमका कसा भरायचा? जाणून घ्या
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

(हे ही वाचा: वजन कमी करण्यासाठी हिरवा मूग आहे फायदेशीर; मूग भिजवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या)

नारळाचे तेल

नारळाच्या तेलात आढळणारे फॅट्स शरीरासाठी चांगले असतात, कारण ते मेटाबॉलिज्म वाढवण्यास मदत करतात आणि त्यामुळे तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते. नारळ तेलामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी देखील सुधारते तसंच नारळ तेल हानिकारक जीवाणू नष्ट करते. तुम्ही दररोज सुमारे २ चमचे खोबरेल तेल सुरक्षितपणे घेऊ शकता. यामुळे तुमच्या आरोग्यावर किंवा शरीरावर कोणताही परिणाम दिसणार नाही.

राइस ब्रॅन ऑइल

राइस ब्रॅन ऑइलमध्ये व्हिटॅमिन ई कॉम्प्लेक्स आणि इतर सूक्ष्म पोषक घटक असतात जे मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. याशिवाय, राईस ब्रॅन ऑइलमध्ये असलेले ओरिझानॉल अँटीऑक्सिडंट तुमच्या कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. राइस ब्रॅन ऑइल रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास आणि इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता सुधारण्यास देखील मदत करते. तुम्ही ते स्वयंपाकासाठी वापरू शकता आणि दररोज सुमारे ३ चमचे ते घेऊ शकता. एवढ्या प्रमाणातील राइस ब्रॅन ऑइल तुमच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचे नुकसान करत नाही.

( हे ही वाचा: वजन कमी करण्यासाठी काकडी आहे उपयुक्त; जाणून घ्या केव्हा आणि कसे खावे)

ऑलिव्ह ऑईल

ऑलिव्ह ऑईल तुमच्या हृदयासाठी चांगले आहे आणि ते लहान मुले आणि प्रौढ लोक या दोघांसाठीही सुरक्षित आहे. ऑलिव्ह ऑईल एचडीएल कोलेस्टेरॉलची पातळी वाढवते आणि खराब कोलेस्टेरॉल म्हणजेच एलडीएलची पातळी कमी करते. तुम्ही दररोज सुमारे ३ चमचे ऑलिव्ह तेल सुरक्षितपणे घेऊ शकता. ऑलिव्ह ऑईलने स्वयंपाक करताना फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे तळणीसाठी वापरू नये.

तिळाचे तेल

तिळाचे तेल अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असते. हे मधुमेह असलेल्या लोकांसाठी फायदेशीर मानले जाते. तिळाच्या तेलाचे सेवन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकते. या तेलामध्ये असलेले,अँटिऑक्सिडंट्स तुमचे हृदय, सांधे, त्वचा, केस आणि बऱ्याच गोष्टींवर फायदेशीर ठरतात. तुम्ही दररोज २ ते ३ चमचे तिळाचे तेल खाऊ शकता. एवढे प्रमाणात तेल रोजच्या वापरासाठी सुरक्षित आहे.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)