Potatoes Beneficial For Many Diseases: भारतीय भाज्यांबद्दल जेव्हा चर्चा होते, तेव्हा सर्वांत आधी भाज्यांचा राजा बटाटा हे नाव घेतले जाते. भारतीय स्वयंपाकघर बटाट्याशिवाय अपूर्ण आहे. बटाटा हा एक असा जिन्नस आहे, जो प्रत्येक पदार्थात घातला जातो. बटाटा वापरून तुम्ही अनेक पदार्थ बनवू शकता आणि त्यामुळे अनेक घरांत बटाटे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात; पण अनेकदा लोक आरोग्याच्या कारणांमुळे बटाटे खाणे टाळतात. बटाट्यामुळे कोणताही अपाय होण्याऐवजी उलट त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. तो खाल्ल्याने रक्तातील साखरही नियंत्रणात राहू शकते. बटाटे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात आणि ते खाल्ल्याने अनेक समस्यांवर उपाय होण्यास मदत होऊ शकते.

बटाटे खाण्याचे फायदे

  • बटाट्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामध्ये अँथोसायनिन्स असतात, जे शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. हे बटाटे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात आणि हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जातात.
  • बटाट्यांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. त्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियमदेखील असते, जे शरीरातील पेशी सक्षम ठेवण्यास मदत करतात. त्याचे नियमित आणि संतुलित प्रमाणात सेवन केल्यास वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.
  • जर तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल, तर बटाटे खाणे फायदेशीर ठरू शकते. कारण- त्यामध्ये भरपूर प्रमाणात कर्बोदके असतात, ज्यामुळे शरीरातील ऊर्जेची पातळी वाढण्यास मदत होते.
  • बटाट्यांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, जे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास आणि बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करते. जर तुम्हाला पचनाच्या समस्या असतील, तर बटाटे खाणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.
  • बटाट्यांमध्ये पोटॅशियम असते, जे उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. मात्र, मधुमेहींनी बटाटे मर्यादित प्रमाणातच खावेत.
  • बटाट्यांमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असतात, जे हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक आहेत. कमजोर हाडे मजबूत करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात बटाट्यांचा समावेश करू शकता.
  • बटाट्यांमध्ये कॅलरीज जास्त असतात, त्यामुळे ते वजन वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात. जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल, तर तुम्ही बटाट्यांचे सेवन करू शकता.
  • बटाट्यांमध्ये फ्लेवोनॉइड्स, कॅरोटीनॉइड्स व फिनोलिक ॲसिड यांसारखे अँटिऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेसाठी चांगले मानले जातात.