scorecardresearch

Premium

Desi Jugaad : जुनी जीन्स फेकू नका! क्रिएटिव्हीटी दाखवून असा करा पुन्हा उपयोग; जाणून घ्या, देशी जुगाड

विशेषत: जीन्स अनेकदा आपण जुनी झाली की वापरणे सोडून देतो. पण, आज आपण जुनी जीन्स पुन्हा कशी वापरावी आणि तिचा पुन्हा उपयोग कसा करावा, हे जाणून घेऊ या.

Dont throw out old jeans
Desi Jugaad : जुनी जीन्स फेकू नका! क्रिएटिव्हीटी दाखवून असा करा पुन्हा उपयोग; जाणून घ्या, देशी जुगाड (Photo : Pexels)

Desi Jugaad : अनेक लोकांना नवनवीन कपडे खरेदी करायला आवडतात. अशात जर जुने कपडे असतील तर काही काळानंतर ते वापरत नाहीत. विशेषत: जीन्स अनेकदा आपण जुनी झाली की वापरणे सोडून देतो. पण, आज आपण जुनी जीन्स पुन्हा कशी वापरावी आणि तिचा पुन्हा उपयोग कसा करावा, हे जाणून घेऊ या.

टेडी बिअर

जुन्या जीन्सपासून तुम्ही टेडी बिअर बनवू शकता. टेडी बिअर बनवायला तुमचा जास्त वेळ खर्च होणार नाही. नंतर तुम्ही टेडी बिअरवर आवडीप्रमाणे सजावट करू शकता.

how to make a normal iron pan non stick chef kunal told Simple Trick Viral Video
साध्या कढईला Non Stick कसे बनवावे? जाणून घ्या सोपी ट्रिक, पाहा व्हायरल व्हिडीओ
Can Toothpaste Remove Nail Polish
Jugaad Video : काय सांगता! टूथपेस्टनी नेल पॉलिश काढता येते; हा जुगाड पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित
Want cigarettes secret ganja Zomato delivery boy sent a shocking message to the customer the screenshot went vira
‘आणखी काही पाहिजे… सिगारेट, सिक्रेट गांजा? झोमॅटो डिलिव्हरी बॉयने ग्राहकाला केला धक्कादायक मेसेज अन्…
hacks to wash utensils without dish wash soap
Kitchen Hacks: साबण, लिक्विड न वापरता करा भांडी एकदम चकाचक; वापरा फक्त ‘या’ ३ सोप्या ट्रिक्स

बॅग

जर जुनी जीन्स असेल तर फेकू नका, त्यापासून तुम्ही सुंदर बॅग बनवू शकता. तुम्हाला आवडेल त्या आकाराची आणि डिझाइनची तुम्ही बॅग बनवू शकता.

खुर्ची कव्हर

जुन्या जीन्सपासून तुम्ही खुर्ची कव्हरही बनवू शकता. फक्त खुर्चीच्या आकाराचे कव्हर तुम्हाला शिवून घ्यावे लागेल.

हेही वाचा : भारतातील दहा सर्वात सामान्य नावं; तुमचे नाव यात आहे का?

मोबाईल, लॅपटॉप आणि टॅब कव्हर

मोबाईल, लॅपटॉप आणि टॅब अत्यंत गरजेच्या वस्तू आहेत. दैनंदिन जीवनामध्ये याचा सर्वाधिक वापर केला जातो. अशात या गोष्टींची काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे. जुन्या जीन्सचा वापर करून तुम्ही मोबाईल, लॅपटॉप आणि टॅबसाठी कव्हर बनवू शकता. ही कव्हर अतिशय आकर्षक दिसतात.

ॲप्रॉन

जुन्या जीन्सचा वापर करून तुम्ही ॲप्रॉन बनवू शकता. डेनिमचे ॲप्रॉन खूप सुंदर दिसते. हे बनवायलाही खूप सोपे आहे. तुम्ही युट्यूबवरील व्हिडीओ पाहून घरच्या घरी ॲप्रॉन बनवू शकता.

खेळणी ठेवण्यासाठी बॅग

अनेकदा लहान मुले खेळताना खेळण्यांचा ढीगभर पसारा करतात. अशावेळी सर्व खेळणी व्यवस्थित ठेवण्यासाठी तुम्ही जीन्सपासून बॅग बनवू शकता. या बॅगमध्ये तुम्ही मुलांची खेळणी ठेवू शकता.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dont throw out old jeans show creativity and know how to reuse old jeans and desi jugaad ideas ndj

First published on: 26-09-2023 at 12:59 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×