DIY Door Lock Fix : पावसाळी वातावरण सगळ्यांना फार आवडतं, पण या काळात घरात अनेक प्रकारच्या समस्याही वाढतात. तुम्ही पाहिलं असेल की, पावसाळ्यात घराच्या खिडक्या-दरवाजे अचानक जाम होऊ लागतात. या जर लाकडी दरवाजे, खिडक्या असतील तर त्या पावसाच्या पाण्यामुळे किंवा वाढत्या आर्द्रतेमुळे फुगून खराब होतात. उघड-झाप करताना त्यातून विचित्र आवाज येऊ लागतो. बऱ्याचदा यामुळे दरवाजा बंद करताना खूप अडचण येते.
दरवाज्यांची लॉकिंग सिस्टीम घट्ट होते. जर तुमच्याही घराचे दरवाजे आणि खिडक्या पावसामुळे जाम झाले असतील आणि आवाज येत असतील, तर तुम्ही खालील उपाय करून या समस्येपासून सुटका करू शकता.
पावसाळ्यात दरवाजे-खिडक्या फुगू नये म्हणून करा ‘हे’ उपाय
१) सँडपेपरचा करा वापर
पावसाळ्यात दरवाजे नियमितपणे स्वच्छ केले तर ते जाम होण्याची शक्यता नसते. बऱ्याचदा सांध्याभोवती गंज लागल्याने दरवाजा जाम होतो. अशा परिस्थितीत लोखंडी खिडक्या किंवा दरवाज्यांवर सँडपेपरने घासून घ्या, यामुळे जाम झालेला दरवाजा अगदी सहजपणे दुरुस्त होऊ शकतो.
२) मेणबत्ती वापरा
पावसात दरवाजा, खिडक्या जाम झाल्या तर खूप त्रास होतो. अशावेळी तुम्ही जाम झालेल्या कडी, लॉकिंग सिस्टीम, दरवाजाचे हँडल, नट, बोल्ट, स्क्रूवर मेणबत्तीचा वापर करा, यासाठी आधी मेणबत्तीचा चुरा करा, तो थोडा वितळवा आणि तो दरवाजाचे हँडल, नट, बोल्ट, स्क्रूवर भरा, यानंतर दरवाजा, खिडकी तीन चार वेळा उघडबंद करा, यामुळे सांधे सैल होतील आणि दरवाजा जाम होण्याची समस्या सुटेल.
३) मोहरीचे तेल सोडा
कधीकधी खिडक्या आणि दरवाजाची कडी आणि गेट इतके घट्ट होतात की ते उघडणे कठीण होते. तसेच त्यातून चर-चर आवाज येत राहतो. अशावेळी तुम्ही मोहरीचे तेल वापरू शकता. यासाठी कोरड्या कपड्यावर मोहरीच्या तेलाचे काही थेंब ओता आणि कपड्याने लोखंडी कडी, दरवाजे आणि खिडक्या पुसा, ज्यामुळे ते उघडणे सोपे होईल.
४) हवामान बदल
जर तुमचा दरवाजा खूप जाम होत असेल तर त्यावर वेदर स्ट्रिपिंग लावावे, यामुळे जाम होण्याची समस्या कमी होते.