Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 Wishes in Marathi : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी १४ एप्रिल रोजी भारतासह जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या जयंतीला आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती म्हणूनदेखील ओळखले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर म्हणूनही ओळखले जाते. भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयानुसार ते जागतिक दर्जाचे वकील, समाजसुधारक होते. बाबासाहेबांनी आपल्या विचारातून एक संपूर्ण आदर्श समाजबांधणीचे काम केले होते. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दरवर्षी मोठ्या संख्येने अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी दादर चैत्यभूमीवर दाखल होतात. या विशेष प्रसंगी तुम्ही तुमच्या WhatsApp, Instagram, Facebook च्या माध्यमातून खास शुभेच्छा देऊ शकता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय समाजासाठी, विशेषत: सामाजिक समता, न्याय आणि मानवी हक्कांसाठी मोठा लढा दिला, उच्च शिक्षण घेत त्यांनी समाजातील जातीपातीवरून होणारा भेद रोखण्याचे कार्य केले. त्याचबरोबर दलित, वंचित, मजूर, महिला यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध उभे राहून त्यांनी प्रदीर्घ लढा दिला.

त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनमोल विचार आजही आपल्याला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आणि खंबीर बनण्याची प्रेरणा देतात. तुम्हीही त्यांचे विचार तुमच्या जीवनात अमलात आणून तुमचे जीवन बदलू शकता. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खास शुभेच्छा जाणून घेऊ..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मराठी शुभेच्छा! | Dr. Ambedkar Jayanti 2026 Messages In Marathi

न्याय, समता, बंधुता यांसाठी लढणाऱ्या महामानवाला सलाम!
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!

Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2026 wishes in marathi
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा (फोटो – chatgpt)

समता, बंधुता आणि न्यायाचा मार्ग दाखविणाऱ्या
महासूर्याला विनम्र अभिवादन!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे
आणि जो ते प्राशन करेल
तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही!
अशा विचारांची प्रेरणा देणाऱ्या
बाबासाहेबांना जयंतीनिमित्त अभिवादन!

समाजाच्या उन्नतीसाठी लढलेला युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!

Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2026 wishes in marathi
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा (फोटो – chatgpt)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा संदेश (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 Quotes in Marathi)

एक विचार, एक क्रांती
महामानवाला अभिवादन
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!

आज बाबासाहेबांची जयंती!
त्यांचा आदर्श आपल्यासाठी दीपस्तंभ आहे
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!

सागराचे पाणी कधी आटणार नाही,
भीमाची आठवण कधी मिटणार नाही,
अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी
आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाहीत…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
जय भीम!!!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा मराठी (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 Shubhechha In Marathi)

‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ – बाबासाहेबांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत!
अशा उत्तम पुरुषाला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2026 wishes in marathi
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती २०२६ शुभेच्छा (photo – chatgpt)

समाजाला उज्ज्वल भविष्य देणाऱ्या डॉ. बाबासाहेबांना आज त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!

राजा होता संविधानाचा, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

समानतेसाठी लढणाऱ्या या महामानवाची जयंती साजरी करूया अभिमानाने!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा (Ambedkar Jayanti 2026 Wishes in Marathi)

विश्वरत्न, विश्वभूषण, भारतरत्न, महाविद्वान, महानायक, अर्थशास्त्री,
महान इतिहासकार, संविधान निर्मिता, क्रांतीसूर्य, युगपुरुष, परमपूज्य बोधिसत्व,
महामानवाला प्रणाम…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!