drink coconut water regularly and rid yourself of these diseases | Loksatta

Coconut Water: नियमित नारळ पाणी प्या आणि ‘या’ आजारांपासून स्वत:ची सुटका करुन घ्या

नियमित नारळ पाणी पिल्याने आपल्या शरीराला पाण्याची कमतरता भासत नाही आणि डिहायड्रेशन थांबते.

Coconut Water: नियमित नारळ पाणी प्या आणि ‘या’ आजारांपासून स्वत:ची सुटका करुन घ्या
नारळ पाणी पिण्याचे आपल्या शरिराला अनेक फायदे आहेत. (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

नारळ पाणी पिण्याचे आपल्या शरिराला अनेक फायदे आहेत. हे आपण नेहमी ऐकत असतो. शिवाय आजारपणात देखील डॉक्टर रुग्णांना नारळ पाणी पाजण्याचा सल्ला देतात. कारण, नारळ पाणी रुग्णांना आजारपणातून बरं करण्यास मदत करते. शिवाय त्या पाण्यासारखं दुसरं कोणतं शुद्ध पेय देखील उपलब्ध नसतं. त्यामुळेच डॉक्टर नारळ पाणी पिण्याचा सल्ला देतात. त्यामुळेच आपण आपल्या रोजच्या सवयीमध्ये नारळ पाण्याचा समावेश केला पाहिजे.

शिवाय नियमित नारळ पाणी पिल्याने आपल्या शरीराला पाण्याची कमतरता भासत नाही आणि त्यामुळे डिहायड्रेशन थांबते. यासह नारळ पाण्याचे अनेक फायदे असून ते पाणी आपले अनेक आजापरांपासून संरक्षण करते. तर चला जाणून घेऊया नारळपाणी प्यायल्याने कोणते आजार आणि समस्या दूर होतात.

उच्च रक्तदाब –

हेही वाचा- शुद्ध मध व भेसळयुक्त मध कसे ओळखायचे? जाणून घ्या याची सोपी पद्धत

ज्या लोकांना उच्च रक्तदाबाचा (BP) त्रास आहे अशा लोकांनी दररोज नारळाचे पाणी पिल्यास ते रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करते. रक्तातील कोलेस्टेरॉल कमी झाल्यामुळे चरबी कमी होते आणि रक्तदाब हळूहळू नॉर्मल होतो.

लठ्ठपणा –

लठ्ठपणा हा एक आजार नसला तरी तो अनेक आजारांना कारणीभूत ठरतो, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी नारळपाणी फायदेशीर ठरु शकते. शिवाय नारळ पाणी पिल्याने तुमच्या शरिरातील लठ्ठपणा जाऊन ते योग्य असा आकार प्राप्त करेल.

हृदयविकाराचा त्रास

आपल्या देशातील अनेक लोकांना हृदयविकाराचा त्रास आहे. त्यामुळे आपण सर्वांनी नारळ पाणी प्यायला हवं. नारळाचे पाणी हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, कोरोनरी धमनी रोग आणि ट्रिपल वेसल डिसीजचा अशा अनेक रोगांपासून आपली सुटका करण्यास मदत करते.

हेही वाचा- मानेवरील काळपटपणा दूर करण्यासाठी ‘या’ पाच घरगुती उपायांचा वापर करा

संसर्गापासून बचाव –

कोरोना महामारीनंतर आपण संसर्गजन्य रोगांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी खूप जागरूक असतो. अशा स्थितीत जर आपण नियमितपणे नारळाचे पाणी प्यायलो तर त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आपण संसर्ग आणि अनेक आजारांशी सहजपणे लढू शकतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 16:21 IST
Next Story
आई xx दे की रिप्लाय!