Cumin/Jeera Water Benefits: सकाळी उठताच एक ग्लास पाणी प्यावे असे अनेक तज्ज्ञ सांगतात. अगदी तुमच्या सोयीनुसार, कोमट, थंड किंवा गरम, लिंबू पिळून, मध घालून, मनुके, अंजीर, सुका मेवा घालून, कशाही पद्धतीने तुम्ही पाणी पिऊ शकता. पण अनेकदा असं होतं की तुम्ही कितीही ठरवलं तरी गडबडीत हे सगळं करणं शक्य होत नाही. अशावेळी तुम्ही पाणी पिण्यासाठी टाळाटाळ करू नये म्हणून आज आपण एक सोपा उपाय पाहणार आहोत. हा पर्याय म्हणजे जिऱ्याचे पाणी. आपल्या अनेकांच्या किचनमध्ये जिरा- मोहरीचे डबे अगदी समोरच असतात. त्यामुळे तुम्हाला शोधाशोधही करावी लागणार नाही. फक्त दिवसभरात कधीही किमान एक ग्लास पाण्यात थोडं जिरं घालून मग तुम्हाला ते पाणी प्यायचे आहे. आता काय करायचं ते तर कळलं पण का करायचं असा प्रश्न अजून आहेच? चला तर मग आपण जिऱ्याचे पाणी पिण्याचे फायदेही पाहूया..
1) जिऱ्यामध्ये दाहविरोधी सत्व असल्याने तुम्हाला चेहऱ्यावर पुरळ आल्यामुळे येणारी सूज व लालसरपणा कमी करण्यासाठी जिऱ्याच्या पाण्याची मदत होते. शिवाय जिऱ्यामधील अँटी-ऑक्सिडंट्स Acne (पिंपल, पुरळ) यांचयासाठी कारणीभूत बॅक्टेरियाची वाढ थांबवतो.




२) जिऱ्यामधील अँटी- ऑक्सिडंट्स हे शरीराच्या डिटॉक्ससाठी म्हणेजच घातक घटक शरीरातून बाहेर फेकण्यासाठी मदत करतात ज्यामुळे नैसर्गिकरित्या तुमचा चेहरा व त्वचा उजळू लागते.
३) जिऱ्याचे पाणी पिण्यासह त्याचा वापर आपण चेहऱ्याला लावून सुद्धा करू शकता. जिऱ्याच्या पाण्यात थेंबभर लिंबाचा रस घालून डोळ्यांच्या खाली येणाऱ्या गडद वर्तुळांना (डार्क सर्कल) लावल्यास तिथली त्वचा उजळण्यास मदत होऊ शकते.
४) तुम्हाला जिऱ्याव्यतिरिक्त कोणत्या वस्तूची ऍलर्जी असल्यास त्यामुळे होणारा त्रास व दाह कमी करण्यासाठी जिऱ्याचे पाणी उपयुक्त ठरते. यामुळे शरीराला थंडावा मिळतो.
५) जर थंडीच्या दिवसांमध्ये तुमची त्वचा कोरडी पडत असेल तर जिऱ्याचे पाणी आणि मधाचे नैसर्गिक मॉइश्चरायजर तुमचं काम सोपं करू शकतं.
६) त्वचेतील ‘सेबम’ ला नियंत्रणात आणून तेलकट त्वचेवर उपाय करण्यासाठी जिऱ्याचे पाणी बेस्ट पर्याय आहे.
७) जिऱ्याचे पाणी त्वचेतील फ्री रॅडिकल्सचे प्रमाण कमी करतात ज्यामुळे सुरकुत्या व वेळेआधी वृद्धत्वाची लक्षणे दिसण्याचे प्रमाण कमी होते.
८) त्वचा चुरचुरणे, सनबर्न किंवा त्वचेला खाज सुटणे अशा स्थितीतही जिऱ्याचा पाण्यातील अँटी-इन्फ्लेमेंटरी सत्व तुमच्या मदतीला धावून येतात व शरीरातील अवयवांना थंडावा देतात.
Banana Peel: केळ्याची साल कधीच फेकू नका, ‘या’ जुगाडू पद्धतींनी वापरून पाहा वाचतील शेकडो रुपये
९) जिऱ्यामध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन्स व मिनरल्समुळे केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
१०) जिऱ्याचा पाण्यामुळे हायपरपिगमेंटेशन (त्वचा कोरडी होऊन काळवंडणे) असे त्रास कमी होण्यास मदत होते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)