नवी दिल्ली : भारतात चहा आणि कॉफी या दोन्ही पेयांना मोठी पसंती आहे. मात्र, नव्या संशोधनामुळे अशा ‘ब्लॅक कॉफी’पासून चार हात दूर राहणेच योग्य ठरणार आहे. कारण ही कॉफी पिणाऱ्या व्यक्तीवर मानसिक परिणाम झाल्याची शक्यता वर्तविण्यात येते.
अमेरिकेतील ‘द रीडर्स डाइजेस्ट’मध्ये प्रकाशित झालेल्या निबंधानुसार ऑस्ट्रियाच्या इनब्रुक्स विद्यापीठाने केलेल्या संशोधनानुसार ‘ब्लॅक कॉफी’ आणि कडू स्वाद असलेली पेये पिणाऱ्या व्यक्ती मनोरुग्ण वक्तिमत्त्वाचे असू शकतात. या संशोधनासाठी एक हजार नागरिकांचा सहभाग होता. गोड चहा, कॉफी अशी पेये सेवन करणाऱ्या व्यक्ती या दया, सहानुभूती आणि सहकार्याची भावना असणाऱ्या असतात. तर, कडू पेयांचे सेवन करणाऱ्या त्याच्या विरुद्ध स्वभावाच्या असण्याची शक्यता असते.
संधोधनानुसार स्वादाची प्राथमिकता ही आपली संस्कृती, स्वभाव यानुसारही ठरते. तसेच त्यामध्ये वारंवार बदलही होतात. दूध आणि साखरेच्या कॉफीपेक्षा ब्लॅक कॉफीचे आरोग्यासाठी काही अविश्वसनीय फायदेही आहेत. तसेच काही दूध आणि साखर वज्र्य करणाऱ्या व्यक्तींबद्दल चुकीची मते तयार करणे अयोग्य आहे.