Buttermilk Health Problems: उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना उष्णता, घाम आणि उकाड्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता, थकवा आणि पोटाशी संबंधित तक्रारी वाढू लागतात. अशा वेळी तहान लागली की अनेक जण ताक पिणे पसंत करतात. या दिवसांत घरोघरी जवळजवळ प्रत्येक जण जेवणाबरोबर ताक पितो आणि बहुतेक लोक दुपारच्या जेवणाच्या वेळी ते पिणे पसंत करतात. हे एक हलके, सहज पचणारे आणि आरोग्यदायी पेय आहे, जे शरीराला आराम देते. परंतु, ताक पिणं सर्वांसाठीच फायदेशीर आहे का?

उन्हाळ्यात ताक आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते; ते शरीराला थंडावा देते आणि पचनक्रिया सुधारते. परंतु, ते प्रत्येकासाठीच फायदेशीर असेल असे नाही. काही परिस्थितींमध्ये ताक प्यायल्याने आजारपण येऊ शकते आणि आरोग्यास हानी पोहोचू शकते.

‘या’ लोकांसाठी ताक पिणं ठरू शकतं घातक

सर्दी आणि खोकला असलेल्यांनी

ताक थंड असते, त्यामुळे सर्दी किंवा खोकला असताना ते पिणे टाळा. जर तुम्हाला कफाचा त्रास असेल तर तुम्ही ते पिणे टाळा.

सांधेदुखीचा त्रास असलेल्यांनी

ज्या लोकांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी ताक पिणे टाळावे. ताक प्यायल्याने सांध्यांच्या समस्या वाढू शकतात.

ॲलर्जी आणि त्वचेचे संक्रमण

जर तुम्हाला त्वचेवर पुरळ आणि खाज येण्याचा त्रास होत असेल तर ताक प्यायल्याने या समस्या वाढू शकतात, त्यामुळे सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे.

मूत्रपिंडाचा आजार

ताकामध्ये प्रथिने आणि सोडियम चांगल्या प्रमाणात असतात. तथापि, ज्यांची मूत्रपिंडे कमकुवत आहेत किंवा ज्यांना मूत्रपिंडाचा गंभीर आजार आहे, त्यांनी ते पिऊ नये. अशा लोकांसाठी ताक हानिकारक ठरू शकते.

लॅक्टोज असहिष्णुता

दुधापेक्षा ताकामध्ये लॅक्टोजचे प्रमाण कमी असते आणि ते पचायला सोपे असते, परंतु ज्या लोकांना लॅक्टोजची तीव्र ॲलर्जी आहे त्यांना पोटात पेटके किंवा गॅसचा त्रास होऊ शकतो.

‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

रात्री ताक पिणे टाळावे, कारण त्यामुळे घसा खवखवू शकतो. याव्यतिरिक्त ताकामध्ये भाजलेले जिरे घालून पाहा, कारण हे पोटासाठी फायदेशीर असते.

ताक पिण्याचे फायदे

पचन

ताकामध्ये प्रो-बायोटिक्स असतात, जे आतड्यांचे आरोग्य राखण्यास मदत करतात. झोपण्यापूर्वी ताक प्यायल्याने अन्नाचे पचन अधिक सहजपणे होण्यास आणि पोट हलके वाटण्यास मदत होते. त्यामुळे गॅस, अपचन आणि जडपणा यांसारख्या समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते.

आम्लपित्त

रात्रीच्या जेवणानंतर आम्लपित्ताची समस्या सामान्यपणे आढळते. ताक पोटाला थंडावा देते आणि आम्लपित्त संतुलित ठेवण्यास मदत करते. त्यातील लॅक्टिक अॅसिड पाचक रसांचे नियमन करते, ज्यामुळे रात्रीच्या वेळी होणाऱ्या ढेकरांपासून आणि छातीत होणाऱ्या जळजळीपासून आराम मिळू शकतो.

चांगली झोप

ताक शरीराला शांत करते आणि मनावर सौम्य आरामदायी प्रभाव टाकते, ज्यामुळे तणाव कमी होऊन चांगली झोप लागण्यास मदत होते. ज्या लोकांना रात्री अस्वस्थता किंवा निद्रानाशाचा त्रास होतो, ते झोपण्यापूर्वी एक ग्लास हलके ताक पिऊ शकतात.

वजन

ताकामध्ये कॅलरीज कमी आणि पोषक तत्त्वे भरपूर असतात. रात्री जड, गोड पेयांऐवजी ताक प्यायल्याने कॅलरीज कमी होण्यास मदत होते आणि पोट भरलेले राहते, ज्यामुळे रात्री उशिरा खाण्याची सवय मोडण्यास आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळू शकते.