Drinking Ghee with Milk at Night: आपण रोज झोपण्यापूर्वी दूध पितो… पण त्या दुधात एक चमचा तूप मिसळल्यास काय होऊ शकतं, याचा कधी विचार केलाय का? ऐकायला साधं वाटणारं हे मिश्रण प्रत्यक्षात शरीरासाठी ‘सुवर्ण पेय’ ठरू शकतं, असं आयुर्वेद सांगतो.

भारतीय परंपरेत दूध आणि तूप यांना विशेष स्थान आहे. दोन्ही घटक स्वतंत्रपणे पौष्टिक असले तरी त्यांचे एकत्रित सेवन केल्यावर त्यांचा परिणाम अधिक प्रभावी ठरतो. दूध शरीराला प्रथिने, कॅल्शियम आणि इतर आवश्यक खनिजं पुरवतं; तर तूप शरीराला स्नेह, ऊर्जा आणि महत्त्वाचे जीवनसत्त्व देतं.

पण खरी कमाल तेव्हा होते, जेव्हा हे दोन्ही घटक एकत्र येतात…

Award Banner

पचन सुधारण्यासाठी रामबाण उपाय!

“एका अभ्यासानुसार (Asian Journal of Food Science and Nutrition मध्ये प्रकाशित), तूप आणि काही नैसर्गिक घटकांचा वापर केल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळण्यास मदत मिळू शकते.” दुधात तूप मिसळून घेतल्यास पचनसंस्था अधिक सुरळीतपणे काम करू शकते. तूप आतड्यांना स्नेहन देते, ज्यामुळे अन्न सहज पचते. बद्धकोष्ठतेची समस्या कमी होण्याचीही शक्यता असते. पोट फुगणे, जडपणा अशा तक्रारींपासूनही आराम मिळू शकतो.

हाडं मजबूत आणि सांधे लवचिक

दुधातील कॅल्शियम आणि तुपातील स्नेह हे घटक एकत्र येऊन हाडांना बळकटी देऊ शकतात. सांध्यातील कडकपणा कमी होऊन, हालचाल सुलभ होण्यास मदत होऊ शकते. वय वाढत असताना होणाऱ्या त्रासातही काही प्रमाणात आराम मिळण्याची शक्यता असते.

मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यास साह्यभूत

तुपातील चांगली चरबी मेंदूसाठी फायदेशीर मानली जाते. दुधातील पोषक घटकांसोबत हे मिश्रण घेतल्यास एकाग्रता वाढू शकते, स्मरणशक्ती सुधारू शकते आणि मानसिक थकवा कमी होण्यास मदत होऊ शकते.

गाढ झोपेसाठी नैसर्गिक उपाय

रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात तूप घालून घेतल्यास मन शांत होण्यास मदत होते. त्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारण्याची शक्यता असते. दिवसभराचा ताण कमी होऊन, शरीर आराम मिळतो, ज्यामुळे सकाळी ताजेतवाने झाल्यासारखे वाटू शकते.

त्वचेला नैसर्गिक चमक

या मिश्रणाचा फायदा फक्त शरीरालाच नाही, तर त्वचेलाही होऊ शकतो. तुपातील स्नेह आणि दुधातील पोषक घटक त्वचेला आतून पोषण देतात. त्यामुळे त्वचा मऊ, तजेलदार दिसू शकते आणि कोरडेपणा कमी होऊ शकतो.

काही जण या पेयात चिमूटभर हळदही मिसळतात, ज्यामुळे त्याचे फायदे आणखी वाढू शकतात.

मात्र, लक्षात ठेवा हे सर्व फायदे ‘शक्यता’ म्हणून सांगितले जातात. प्रत्येकाच्या शरीरप्रकृतीनुसार परिणाम वेगवेगळे असू शकतात.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून, अधिक माहितीसाठी तज्ज्ञ / डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)