आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत की तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का? तांब्या हा एकमेव धातू आहे, ज्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म आहेत. तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्याने डोकेदुखी आणि अगदी कॉलराच्या उपचारांमध्ये खूप फायदेशीर ठरत असल्याचे सिद्ध झाले आहे. आयुर्वेदातही या धातूचा वापर अत्यंत उपयुक्त मानला जातो. तुम्ही जर घरात वापरल्या जाणाऱ्या भांडीसाठी, विशेषत: पाणी पिण्याचा जग, ग्लास आणि बाटल्या या ऐवजी तुम्ही तांब्याचा भांड्याचा वापर केला गेला तर ते आरोग्यासाठी मोठे फायदेमंद ठरू शकतो. चला तर मग जाणून घेऊयात तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्याने होणारे फायदे.

तांब्यामध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. जे कर्करोगास कारणीभूत मुक्त रॅडिकल्स आणि त्यांचे दुष्परिणाम कमी करण्यास मदत करतात.

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….
Radish recipe
बटाट्याचे काप नेहमी खाता, एकदा मुळ्याचे काप खाऊन तर पाहा, नोट करा सोपी रेसिपी

तांब्यामध्ये मेलेनिन हे तत्व आहे. जे तुमच्या त्वचेला अतिनीलपासून संरक्षण करते आणि त्वचेला होणारे नुकसान देखील टाळते.

अमेरिका कॅन्सर सोसायटी या संस्थेच्या मते, तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी कमी करते.

तांबा हा अत्यंत उपयुक्त धातू आहे. ज्याने तुमच्या शरीरातील थायरॉईड ग्रंथी सुरळीत चालण्यास मदत करते.

तुम्ही दररोज तांब्याच्या भांड्यातले पाणी प्यायलात तर ते हिमोग्लोबिन तयार करण्यास आणि शरीरातील लोह शोषण्यास मदत करते. ज्यामुळे तुमच्या शरीरातील अशक्तपणाची तक्रार दूर होते.

तांब्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे सांधेदुखीच्या वेदना दूर करण्यास मदत करतात.

तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी तांब्याच्या भांड्यामधील पाणी प्रभावी ठरते. तसेच रक्तपेशींमध्ये उपस्थित फलक काढून रक्त परिसंचरण वाढवते, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.

तांबे एक नैसर्गिक अँटी-बायोटिक आहे.

तांब्याच्या बाटलीत किंवा ग्लासातुन पाणी प्यायल्याने कॉलरा किंवा दूषित पाण्यामुळे होणारे अनेक प्रकारचे संक्रमण टाळता येतात. त्याचबरोबर हे शरीराला डिटॉक्स देखील करते.


तांब्याच्या बाटलीमध्ये पाणी ठेवणे किती काळ फायदेशीर आहे?

तुम्ही जर रात्री तांब्याच्या, ग्लासात किंवा बाटलीत पाणी ठेवले तर हे पाणी सकाळी तुम्ही प्या. तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी ६ ते ८ तासांनी प्यायल्याने फायदेशीर ठरते. तसेच हा पाणी पिण्याचा आरोग्यदायी मार्ग म्हणजे रिकाम्या पोटी पिणे. हे लक्षात ठेवा की तुम्ही ते दिवसातून या तांब्याच्या भांड्यात दोनदा पाणी भरा आणि प्या.