Health Benefits of Walnut: अक्रोड या ड्रायफ्रूटला इंग्रजीत Walnuts असेही म्हणतात. हा एक असा ड्राय फ्रूट आहे ज्याला ब्रेन-फूड देखील म्हटले जाते. या ड्रायफ्रूटच्या सेवनाने मेंदू तीक्ष्ण होऊ शकतो. अँटिऑक्सिडंट्स, खनिजे, जीवनसत्वांनी भरपूर असलेला अक्रोड मेंदूला तीक्ष्ण आणि शरीराला निरोगी ठेवतो.

याचे सेवन केल्याने IQ पातळी देखील वाढते. अक्रोड कोणत्याही वयोगटातील लोक खाऊ शकतात. हे हृदयापासून मेंदूला निरोगी ठेवते. ओमेगा-३ फॅटी अॅसिडने समृद्ध असलेले अक्रोड
रक्तदाब नियंत्रित करते.

health benefits of lauki
तुम्ही उन्हाळ्यात दर आठवड्याला दुधी खाल्ला तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…
Can hugs, a massage and holding hands relieve you of stress?
जादू की झप्पी गरजेची; मिठी मारल्याने खरंच तणाव कमी होतो? काय आहे ‘टच थेरपी’? जाणून घ्या फायदे
drinking warm water
तुम्ही दररोज आठ ग्लास गरम पाणी प्यायल्याने शरीरात कोणते बदल होतील? तज्ज्ञांनी सांगितले फायदे व तोटे
Benefits of Drinking Okra Water
एक महिना ‘हे’ पाणी प्यायल्याने झपाट्याने वजन होईल कमी; कोलेस्ट्रॉलही राहील नियंत्रणात, एकदा फायदे वाचाच!

आयुर्वेदात अक्रोडाचे सेवन पुरुषांमध्ये शुक्राणूंची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रभावी आहे. याचे सेवन केल्याने मधुमेहाच्या रुग्णांना फायदा होतो . होमिओपॅथी डॉ.कुलदीप जांगीड यांच्या मते, अक्रोड खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. अक्रोड शरीराला आतून मजबूत बनवते, तसेच हाडे मजबूत करते. लोक अक्रोडाचे सेवन दोन प्रकारे करतात. काही लोक अक्रोड कच्चे खातात तर काहीजण अक्रोड भिजवून खातात. हिवाळ्यात भिजवलेले अक्रोड आरोग्यासाठी फायदेशीर आहेत की सुके अक्रोड फायदेशीर आहेत हे तज्ञांकडून जाणून घेऊया…

हिवाळ्यात अक्रोडाचे सेवन कसे करावे, भिजवलेले की सुके?

हिवाळ्यात आपल्या शरीराला उर्जेची जास्त गरज असते. या ऋतूत तुम्हाला हवे असल्यास अक्रोड न भिजवता खाऊ शकता. सुक्या मेव्यातील बहुतेक गुणधर्म फक्त अक्रोडातच असतात. व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सने युक्त अक्रोड खाल्ल्याने हिवाळ्यात प्रतिकारशक्ती मजबूत राहते आणि शरीराला ऊर्जा मिळते. रोज चार अक्रोड खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

( हे ही वाचा: लघवीद्वारे खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने काढून टाकतील ‘हे’ ४ पदार्थ? डॉक्टरांकडून जाणून घ्या सेवनाची पद्धत)

हिवाळ्यात तुम्ही अक्रोड दुधात घालून खाऊ शकता. यासाठी ४ ते ५ अक्रोड रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी त्याचे दुधात घालून सेवन करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पाण्यात भिजवलेले अक्रोड देखील वापरू शकता. हिवाळ्यात भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने शरीराला अधिक पोषण मिळते.

भिजवलेल्या अक्रोडाचे आरोग्य फायदे

सुक्या अक्रोडांपेक्षा भिजवलेले अक्रोड शरीराला अधिक पोषण पुरवतात. भिजवलेले अक्रोड त्वचा निरोगी बनवते आणि चयापचय वाढवते. याचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. भिजवलेले अक्रोड केस हेल्दी बनवण्यासाठीही खूप फायदेशीर आहे. हे अँटी एजिंग ड्रायफ्रूट आहे ज्याचा त्वचेवर चांगला प्रभाव पडतो.