आज करोनामुळे निर्माण झालेल्या लॉकडाउनच्या परिस्थितीत विदयार्थ्यांना पुस्तकांशिवाय अभ्यास कसा करायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा आहे. ई लर्निंगने अशा अभ्यासू विदयार्थ्याना त्यांच्या शिक्षणात कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी मोफत पुस्तकांची लायब्ररी उपलब्ध करून दिली आहे. ही मोफत पुस्तके तुम्ही ऑनलाईन वाचू शकता किंवा डाउनलोड करू शकता.
मोफत पुस्तके उपलब्ध करून देण्याऱ्या वेबसाइट्सची माहिती-




पीडीएफ ड्राइव्ह डॉट कॉम (https://www.pdfdrive.com/)
पीडीएफ ड्राइव्ह डॉट कॉम या वेबसाइटवर ८२,००० हून अधिक पुस्तके आहेत. ती पुस्तके तुम्ही डाउनलोड करू शकतात. या वेबसाईटवर पुढील विषयांवरची पुस्तके उपलब्ध आहेत.
बायोग्राफी, आर्ट, बिझनेस अँड करिअर, लाइफस्टाइल, पॉलिटिक्स अँड लॉ, पर्सनल ग्रोथ, सायन्स अँड रिसर्च, टेक्नॉलॉजी इत्यादी.
पीडीएफ बुक्स वर्ल्ड (www.pdfbooksworld.com)
पीडीएफ बुक्स वर्ल्ड या वेबसाइटवर अनेक विषयांची पुस्तके मोफत उपलब्ध आहेत. विदयार्थी इंग्रजी साहित्याचा अभ्यासक असेल तर त्याला इथे खजिनाच प्राप्त होईल.
इंग्रजी भाषेतील जगप्रसिद्ध पुस्तके तुम्ही इथे नक्कीच वाचू शकाल. ती पुस्तके पुढीलप्रमाणे आहेत-
थिंक अँड ग्रो रिच -नेपोलिअन हिल, ऑलिव्हर ट्विस्ट -चार्ल्स डिकन्स, दि टाइम मशीन- एच. वेल्स, दि स्टोरी ऑफ माई लाईफ- हेलन केलर, दि आर्ट ऑफ पब्लिक स्पिकिंग -डेल कार्नेगी
गुटेनबर्ग डॉट ओआरजी (gutenberg.org)
गुटेनबर्ग डॉट ओआरजी या वेबसाईटवर ६१,८३२ पुस्तके उपलब्ध आहेत. याचे मोबाईल अॅप गुगल प्ले वर उपलब्ध आहे. ते तुम्ही डाउनलोड करू शकता. बुकशेल्फ हा ऑप्शन निवडून विविध विषयांची लिस्ट किंवा सूची चेक करून आपल्या आवडीचे पुस्तक निवडू शकतात.
फ्री ईबुक्स डॉट नेट (free-ebooks.net)
फ्री ईबुक्स डॉट नेट या वेबसाईटवर पुढील विषयांवरची पुस्तके उपलब्ध आहेत. ऍडव्हर्टाइझिंग, ब्युटी अँड फॅशन, बिझनेस, कम्प्युटर अँड इंटरनेट, इकॉनॉमी
मेनी बुक्स डॉट नेट (manybooks.net)
मेनी बुक्स डॉट नेट या वेबसाईटवर पुढील विषयांची पुस्तके उपलब्ध आहेत. बायोग्रफी, आर्ट, ड्रामा, रोमान्स इत्यादी.
बुकबून डॉट कॉम (bookboon.com)
डेन्मार्क मध्ये १९८८ साली स्थापन झालेल्या बुकबून या ऑनलाईन कंपनीने इंजिनीरिंग तसेच विविध विषयांवर हजारांहून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत. करोनाची पार्श्वभूमी जाणून विदयार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासाला उपयुक्त अशी मोफत पुस्तके त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिली आहेत.
मोफत पुस्तके तीस दिवसांच्या ट्रायल पिरियडमध्ये उपलब्ध आहेत. त्यानंतर जर तुम्ही मासिक २९९ रुपये भरून प्रीमियम पॅकेज घेतले तर विदयार्थी आपल्या आवडीची पुस्तके डाउनलोड करू शकतात व इतर विषयांच्या पुस्तकांना त्यांना ‘फुल ऍक्सेस’ मिळतो.
या वेबसाईटवर पुढील विषयांची पुस्तके उपलब्ध आहेत-:
इकॉनॉमिक्स अँड फायनान्स, इंजिनीरिंग मॅथेमॅटिक्स, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, बेसिक्स ऑफ अकाउंटिंग इत्यादी.
मराठी पुस्तके
मराठी पुस्तके वाचायची असतील तर esahitya.com या वेबसाईटवर विविध विषयांवरची पुस्तके उपलब्ध आहेत. त्यांच्या विषयाची सूची पुढीलप्रमाणे आहे-
इतिहास, चरित्र, विनोद, प्रवासवर्णन, नाटक, ऑडिओ इत्यादी.
दुसरी वेबसाईट आहे sahityachintan.com
हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषांतील उत्तम लेखकांची पुस्तके तुम्हाला या वेबसाईटवर वाचायला मिळतील. ४५० पुस्तके या वेबसाईटवर उपलब्ध असून ८५९० एवढ्या वाचकांनी वेबसाईटला भेट दिली आहे. तसंच मराठी पुस्तके वाचनासाठी sahitya.marathi.gov.in, bookganga.com, ebooks.netbhet.com इत्यादी वेबसाईट्सना आपण भेट देऊ शकता.
पुस्तके वाचनासाठी विविध मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून आपण ते डाउनलोड करू शकता. मराठी कादंबऱ्या, storytel, BookGanga E-book reader, State Board Books(बालभारती), आठवणीतले पु ल देशपांडे इत्यादी
तर अशा रीतीने इ-लर्निंग च्या मदतीने विदयार्थी आपल्या आवडीचे पुस्तक निवडून आपल्या विषयाचा अभ्यास पूर्ण करू शकतो.
गौरीता माधव मांजरेकर
gauritamanjrekar9@gmail.com