Common Pregnancy Symptoms: मासिक पाळी उशिरा येणे हे गरोदरपणाचे सर्वात प्रथम लक्षण मानले जाते पण अनेकदा पिरीएड्स उशिरा येण्यामागे शरीरातील हार्मोन्स व पीसीओस/ पीसीओडी सारखे विकारही कारणीभूत असतात. पण मग अशा परिस्थितीत गर्भधारणा झाल्याचे ओळखायचे कसे? अलीकडे बाजारात प्रेग्नंसी टेस्ट किट अगदी स्वस्त दरात उपलब्ध असतात त्यामुळे या टेस्ट घेतल्या की कोणत्याही लक्षणांचा विचार न करता आपल्याला उत्तर मिळू शकते असं जर तुम्हाला वाटत असेल तर थांबा. सर्वप्रथम प्रेग्नन्सी टेस्ट या १००% योग्य उत्तर देऊ शकतील याची खात्री नसते शिवाय योग्य उत्तर मिळण्यासाठी आपल्याला थोडावेळ वाट पाहावी लागते म्हणजेच सुरुवातीच्या टप्प्यात या टेस्टमधून प्रेग्नन्सी ओळखली जात नाही. मग आता आपण गरोदर आहोत की नाही हे कसं ओळखायचं?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गर्भधारणेच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यात शरीरात काही बदल होत असतात. खाली नमूद केलेले हे बदल दिसून आल्यावर आपण डॉक्टरांचा सल्ला घेणेच फायद्याचे ठरेल.

१) संवेदनशील नाक

गर्भधारणेच्या नंतर तुमचे नाक अत्यंत संवेदनशील होते म्हणजेच अगदी दूरवर येणारा कोणतातरी दर्प सुद्धा आपण ओळखू शकता. काहींना या वासाने मळमळ, उलट्यांचा त्रास होऊ शकतो.

२) स्तनांचे बदल

गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात स्तन आणि/किंवा स्तनाग्र अनेकदा दुखतात, सुजतात किंवा नरम होतात. याचे कारण म्हणजे स्तनपानाच्या तयारीसाठी स्तनांमध्ये बदल होत असतात. हे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनच्या वाढत्या स्तरामुळे होते. याशिवाय स्टेनगरांच्या आजूबाजूची त्वचा गडद होत जाते.

३) थकवा

तुम्हाला नेहमीची कामे करतानाही थकवा जाणवू शकतो. शरीरात होणारे बदल तुमच्या शरीराला आतून ऍक्टिव्ह ठेवतात परिणामी अंगदुखीचा त्रास होऊ शकतो.

Diabetes Control: शिळा भात खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

४) योनीतुन हलका रक्तस्त्राव

सहसा हा रक्तस्त्राव मासिक पाळीप्रमाणे गडद लाल रंगाचा नसून पुसत गुलाबी किंवा लाल रंगाचा असतो. तसेच सलग रक्तस्त्राव होत नाही. अनेक महिलांनी सांगितले की सहसा लैंगिक संबंध ठेवल्यावरही अशा प्रकारचा रक्तस्त्राव होत असतो. तर गर्भधारणेच्या १२ दिवसांनी याचे प्रमाण वाढते.

५) सतत लघवी होणे

गर्भधारणा झाल्यानंतर दोन ते तीन आठवड्यांनंतर तुम्हाला सतत लघवीला जावेसे वाटू शकते. या काळात मूत्रपिंडात रक्त प्रवाह वाढतो, तसेच वाढते गर्भाशय मूत्रपिंडावर दाब निर्माण करत असल्याने लघवीचे प्रमाण वाढू शकते.

६) अपचन व गॅस

गर्भधारणेच्या सुरुवातीच्या टप्प्यात अपचनाचा त्रास वाढू शकतो, शिवाय शरीरात गॅस तयार होतात त्यामुळे अनेकदा पोट कडक होणे, शौचास न होणे असेही त्रास उद्भवतात.

७) तोंडात सतत लाळ तयार होणे

याला पेटायलिझम ग्रॅव्हिडारम असेही म्हणतात, काही मातांना गरोदरपणाच्या सुरुवातीला तोंडात अधिक लाळ तयार होत असल्याचे जाणवते. हे लक्षण सहसा पहिल्या तीन महिन्यात सुरू होते आणि पोटातील ऍसिडपासून तुमचे तोंड, दात आणि घसा सुरक्षित ठेवण्याचे काम करते.

दरम्यान यातील सर्व लक्षणांची दखल घेण्याची गरज असली तरी यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही, या लक्षणांना १००% गरोदर असल्याचे निकष मानू नका उलट अशा स्त्रियांनी वैद्यांचा सल्ला घ्यावा.

(टीप: वरील लेख माहितीपर आहे यास वैद्यकीय सल्ला समजू नये)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Early signs of pregnancy commonly seen symptoms in pregnancy first 20 days how to spot changes in body svs
First published on: 02-10-2022 at 13:51 IST