पांढऱ्या शुभ्र दातांसाठी ‘हे’ करुन पाहा

घरगुती उपायांचा करा वापर

दिवसभर आपण वेगवेगळ्या गोष्टी खात असतो. बाहेर कोणतेही पदार्थ खाल्ल्यानंतर आपण तोंड धुतोच असे नाही. त्यामुळे दातांवर एकप्रकारचा थर जमा होतो. हा थर दिर्घकाळ तसाच राहीला तर दात पिवळे दिसू लागतात. बाहेरचे खाणे, व्यसने, पदार्थांमधील रंग यांमुळे दातांचा पांढरा रंग जाऊन ते पिवळे दिसू लागतात. काही लोक अतिशय घाईमध्ये ब्रश करतात त्यामुळेही त्यांचे दात खराब दिसतात. ही समस्या दूर करायची असल्यास काही विशेष प्रयत्न करणे गरजेचे असते. त्यासाठी काही सोप्या उपायांचा अवलंब फायद्याचा ठरतो. तेव्हा पाहूयात असेच काही सोपे उपाय

१. बेकींग सोडा – दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी बेकींग सोडा अतिशय उपयुक्त असतो. ज्याप्रमाणे आपण दात साफ करण्यासाठी मीठाचा वापर करतो त्याप्रमाणेच बेकींग सोडा उपयोगी ठरतो. दात घासताना ब्रशवर थोडा बेकींग सोडा घेऊन हळूहळू दात साफ करावेत. यामुळे दातावरील पिवळेपणा हळूहळू साफ होण्यास मदत होईल.

२. दूध आणि दूधाची उत्पादने – दातांना चमक येण्यासाठी बाजारात अनेक प्रकारची उत्पादने मिळतील. मात्र त्यामुळे दातांचा तोटा होण्याचीच शक्यता जास्त आहे. त्यामुळे दूध आणि दूधाच्या पदार्थांमुळे दाताचा पिवळेपणा दूर होऊन चमक परत येईल. याचे कारण म्हणजे दातांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. जो दातांसाठी अतिशय उपयुक्त असतो. ज्या लोकांची पिवळ्या दातांची तक्रार असते त्यांनी चहा आणि कॉफीचे सेवन करु नये.

३. मीठ – दातांना चमक आणण्यासाठी मीठाचा पूर्वीपासून वापर केला जातो. मीठामध्ये सोडियम आणि क्लोराईड असल्याने त्याचा दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी अतिशय चांगला उपयोग होतो. असे असले तरीही हे मीठ प्रमाणात वापरायला हवे. प्रमाणापेक्षा जास्त मीठाचा वापर केल्यास त्याने दातांना हामी पोहचण्याचीही शक्यता असते.

४. लिंबू – दात साफ करण्यासाठी लिंबूही अतिशय उपयुक्त असते. खाल्ल्यानंतर लिंबूने दात साफ केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. रोज रात्री खाल्ल्यानंतर लिंबाचा रस आणि पाणी एकत्र करुन ठेवावे. खाल्ल्यानंतर या पाण्याने गुळण्या करा. त्यामुळे दातांचा पिवळेपणा नक्कीच दूर होण्यास मदत होईल. यामुळे दातांचा वासही दूर होतो. किमान आठवड्यातून एकदा हा प्रयोग जरुर करावा.

(ही बातमी जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Easy home remedies for sparkling white teeth

ताज्या बातम्या