Tips For Dry Skin During Winter: गेल्या ४ ते ५ दिवसांपासून महाराष्ट्रात बऱ्यापैकी गारवा जाणवत आहे. हवामानात बदल झाल्यावर ज्याप्रकारे आपण आपली आहारशैली बदलतो किंवा काही व्हायरल इंफेक्शन्स होऊ नये म्हणून काळजी घेतो. मात्र याचसोबत हिवाळ्यात तापमान कमी होत असताना कोरडी त्वचा ही सर्वात सामान्य समस्यांपैकी एक ठरते. या संपूर्ण ऋतूमध्ये तुमची त्वचा मऊ, गुळगुळीत आणि हायड्रेट ठेवण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स तुम्ही ट्राय करू शकता.
१. आंघोळ केल्यानंतर किंवा फेसवॉश केल्यानंतर लगेचच तुमची त्वचा ओलसर असतानाच मॉइश्चराइझर लावा. यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते आणि कोरडेपणा येत नाही.
२. हिवाळ्यात साधारणपणे वापरले जाणारे हलके लोशन्स पुरेसे नसतात. शिया बटर, सिरॅमाइड्स किंवा हायलुरोनिक अॅसिड सारख्या घटकांसह घट्ट, क्रीम बेस्ड मॉइश्चराइझर्सची निवड करा. ते अधिक काळापर्यंत त्वचा मऊ ठेवतील.
३. हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करणे टाळा, कारण त्यामुळे नैसर्गिक तेल निघून जाऊ शकते. त्याऐवजी कोमट पाणी निवडा आणि तुमचा आंघोळीचा वेळ १० मिनिटे किंवा त्यापेक्षाही कमी ठेवा.
४. हिवाळ्यात त्वचेसाठी खूप रफ साबण किंवा फोमिंग क्लिन्झर वापरणे टाळा. सौम्य, सुगंधमुक्त क्लीन्झर वापरा, जे तुमची त्वचा कोरडी न करता स्वच्छ करतात.
५. हिवाळ्यामध्ये दिवसभर भरपूर पाणी प्या. हर्बल टी आणि काकडी तसंच संत्री यासारखे पाण्याचे जास्त प्रमाण असलेले पदार्थदेखील तुमची त्वचा हायड्रेट ठेवण्यास मदत करू शकतात.
६. हिवाळ्यात हिटींग सिस्टिममुळे घरातील आर्द्रता कमी होते. त्यामुळे त्वचा कोरडी होते. ह्युमिडीफायर हवेत आर्द्रता वाढवते आणि त्यामुळे तुमची त्वचा कोरडी होण्यापासून रोखण्यास मदत होते.
७. थंडीच्या दिवसांत बाहेर पडताना हातमोजे, स्कार्फ आणि टोप्या घाला. सनस्क्रीन लावायला विसरू नका कारण हिवाळ्यातही अतिनील किरणे तुमच्या त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात.
