भारतात आता सगळ्यांनाच उन्हाची झळ बसू लागली आहे. यावेळी आपण अशा पदार्थांचे सेवन करायला हवे ज्यांचा गुणधर्म थंड आहे. थंड गुणधर्म असणाऱ्या वस्तूंमध्ये दह्याचा देखील समावेश होतो. उन्हाळ्यात नियमित दह्याचे सेवन केल्याने शरीराला थंडावा तर मिळतोच, सोबतच आपण निरोगीही राहतो. आज आपण जाणून घेऊया की उन्हाळ्यात दह्याचे सेवन केल्याने आपल्याला काय काय फायदे होऊ शकतात आणि आपण कोणत्या आजारांपासून दूर राहू शकतो.

दह्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, साखर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, तांबे, सेलेनियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी-६, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन के इ. पोषक तत्त्व आढळतात.

Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
cabbage for weight loss
तुमच्या घरी कायम असणारी ‘ही’ भाजी वाढलेले वजन झपाट्याने करेल कमी; लगेच करा रोजच्या जेवणात समावेश
8 Poses For hair growth, healthy scalp,
मानेपासून खांदा व कंबरेपर्यंत केस वाढण्यासाठी ‘या’ ८ हालचाली करून पाहाच; केस धुताना सुद्धा ‘ही’ गोष्ट पाळा
Benefits of Drinking Okra Water
एक महिना ‘हे’ पाणी प्यायल्याने झपाट्याने वजन होईल कमी; कोलेस्ट्रॉलही राहील नियंत्रणात, एकदा फायदे वाचाच!

वाढत्या उष्णतेसोबत वाढला ‘या’ आजारांचाही धोका; ‘ही’ लक्षणे दिसल्यास त्वरित सावध व्हा

रोगप्रतिकारक शक्ती वाढते :

उन्हाळ्यात दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. यातील पहिला फायदा म्हणजे प्रतिकारशक्ती चांगली होते. जर तुम्ही रोज दह्याचे सेवन केले तर तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होईल.

हाडे मजबूत होतात :

याशिवाय दह्याचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. वास्तविक, दह्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात आढळतात. अशाप्रकारे हाडांसोबतच दातही निरोगी बनतात.

शाकाहारी लोकांनी अंडी आणि मांसाच्या जागी ‘या’ पदार्थांचा करावा आहारात समावेश; मिळतील सर्वाधिक प्रोटीन्स

वजन कमी करण्यास मदत होते :

ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे. त्यांनी आजच आपल्या आहारात दह्याचा समावेश करावा. दह्यामध्ये प्रथिने आढळतात. तसेच यात हेल्दी फॅट्स असतात. उन्हाळ्यात रोज दह्याचे सेवन केल्यास वजन कमी करण्यासोबतच उच्च कोलेस्ट्रॉलच्या समस्येवरही मात करता येते.

पचनशक्ती सुधारते :

जर तुम्ही रोज दह्याचे सेवन केले तर ते तुमची पचनसंस्था देखील निरोगी राहू शकते. दह्यामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात, ज्यामुळे तुम्हाला अनेक फायदे मिळतात.

(येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)