शरीरात रक्ताची कमतरता जाणवते? आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश!

शरीरात जर रक्ताची कमतरता असेल तर तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे.

रक्ताच्या कमतरतेमुळे आपल्या शरीरासाठी आणखी अनेक समस्या उद्भवू लागतात.

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या आहारामुळे आपल्याला अनेक व्याधी-आजार होण्याचा धोका असतो. शरीरातील रक्ताची कमतरता ही अशीच एक समस्या आहे. रक्ताच्या कमतरतेमुळे आपल्या शरीरासाठी आणखी अनेक समस्या उद्भवू लागतात. या आजारांकडे अनेक दिवस दुर्लक्ष करत राहिल्याने ते गंभीर देखील होऊ शकतात. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अशक्तपणा जाणवणे, चक्कर येणे, निद्रानाश, थकवा यासारखी लक्षणे आपल्या जाणवू लागतात. त्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता असल्यास आपल्या आहारात या काही पदार्थांचा समावेश करणं आवश्यक आहे. या पदार्थांमुळे नैसर्गिकरित्या तुमच्या रक्त वाढतं आणि अन्य समस्या देखील दूर होतात.

टोमॅटो

टोमॅटोचे सेवन केल्यास शरीरातील रक्ताची पातळी वाढते. टोमॅटोचे सॅलड किंवा भाजी मध्ये समावेश करा. तुम्ही काही दिवस सकाळी ४ ते ५ टोमॅटोचा ताजा रस करून घ्या किंवा तुम्ही ते सूप बनवूनही पिऊ शकता. याने तुम्हाला रक्ताची कमतरता भासणार नाही. मात्र ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांनी टोमॅटोच अधिक प्रमाणात सेवन करणे टाळावे.

बीट

बीटमध्ये मुबलक प्रमाणात लोह आणि फॅलिक एसिड असते. त्यामुळे रक्त वाढण्यास मदत होते. याकरिता तुम्ही दररोज तुमच्या आहारात बीटच सेवन करा. रक्त वाढण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात नियमितपणे रोज सकाळी १ कप बीटचा रस जरूर प्यावा.

पालक

शरीराचे कार्य नीट सुरू ठेवण्यासाठी शरीरात रक्ताची पातळी योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे. याकरिता तुमच्या आहारात पालकाचा समावेश करा. पालकमध्ये आयर्न मोठ्या प्रमाणात असतं. हा याचा मुख्य स्त्रोत आहे. या करिता नियमित पालकचे सेवन केल्यास शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. त्याचबरोबर मानसिक तणाव देखील दूर होतो.

सफरचंद

दररोज एक सफरचंद खाल्ल्याने आजार दूर होतात असं म्हटलं जात.या करिता आपण सगळ्यांनी आजार दूर ठेवण्यासोबतच सफरचंद खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिन वाढते. याने शरीरातील रक्ताची कमतरता भरुन निघते.

डाळिंब

डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. जे आपल्या शरीरात रक्त तयार करण्यासाठीचे आवश्यक घटक आहे. डाळिंब खाल्ल्याने शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते.

(टीप: वरील टिप्सचा वापर करताना आपल्या फॅमिली डॉक्टरांचा व तज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Eat these foods to increase hemoglobin in the body scsm