Blood Purifying Foods: तुमच्या शरीराच्या सर्व अवयवांना आवश्यक पोषक द्रव्ये पोहोचवण्यात रक्ताची विशेष भूमिका असते. म्हणूनच शरीरातील रक्त अत्यंत स्वच्छ असणे आवश्यक आहे. परंतु आपण सर्वजण असे काही पदार्थ खातो किंवा पितो, ज्यामुळे आपले रक्त प्रदूषित होते किंवा शरीरातील विषारी पदार्थांचे प्रमाण वाढते. रक्तामध्ये असलेली घाण केवळ तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत करत नाही तर अनेक गंभीर आरोग्य समस्यांना देखील आमंत्रण देते. रॅशेस, ऍलर्जी, खाज येणे इत्यादी त्वचेशी संबंधित अनेक समस्या देखील रक्तातील विषारी द्रव्ये जास्त झाल्यामुळे उद्भवतात. रक्त स्वच्छ करण्यासाठी लोक टॉनिकपासून ते व्यायाम आणि अगदी योगासनेही करतात. पण तुम्हाला माहीत आहे का, तुमच्या आहारातील काही बदल किंवा काही पदार्थांचा समावेश केल्याने रक्त नैसर्गिकरित्या शुद्ध होण्यास मदत होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया अशा काही पदार्थांबद्दल ज्यामुळे तुमचे रक्त नैसर्गिकरित्या शुद्ध होऊ शकते.

रक्त शुद्ध करण्यासाठी हे पदार्थ खा

पुरेसे पाणी प्या

तुमचे शरीर डिटॉक्स करण्याचे काम किडनी करत असते. जास्त पाणी प्यायल्याने किडनीचे कार्य सुधारते आणि शरीरातील टाकाऊ पदार्थ सहज बाहेर पडतात. त्यामुळे दिवसातून किमान २ ते ३ लिटर पाणी पीत जा.

Health Benefits of Avocado
झपाट्याने वजन कमी करणारे हिरव्या रंगाचे ‘हे’ फळ कापण्यापूर्वी स्वच्छ धुवा; तज्ज्ञ म्हणतात, अन्यथा पडेल महागात
Breakfast Recipe
Breakfast Recipe : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी बनवा मुगडाळीचा पौष्टिक नाश्ता, जाणून घ्या ही हटके रेसिपी
How to soften your face with Malai Dry Skin Care
Skin Care: दुधाची २ चमचे साय घ्या आणि उन्हाने काळवंडलेल्या-निस्तेज चेहऱ्यावर करा जादू
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन

(हे ही वाचा: Foods For Platelets: रक्तातील प्लेट्सलेटची संख्या वाढवण्यासाठी ‘या’ गोष्टींचा आहारात समावेश करा; नक्कीच फायदा होईल)

सफरचंद खा

सफरचंदामध्ये भरपूर पोषक असतात, त्यात फायबरची चांगली मात्रा असते, ज्यामुळे ते पचन सुधारण्यास आणि टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात. डॉक्टर देखील दररोज एक सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. ज्यामुळे अनेक आजार दूर होतील.

कॉफी प्या

कॉफीचे सेवन केल्याने यकृताचे कार्य सुधारते, जे रक्त स्वच्छ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र, कॉफी पिण्याचा अतिरेक देखील करू नका. नाहीतर त्याचे दुष्परिणाम देखील उद्भवतील. दिवसातून एकदा कॉफी पिणं निरोगी आरोग्यासाठी चांगलं आहे.

ग्रीन टी प्या

ग्रीन टी पिणे शरीर डिटॉक्स करण्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये अँटिऑक्सिडंट्सही भरपूर असतात त्यामुळे यकृत निरोगी राहते. तसंच हे रक्तातील अतिरिक्त चरबी जमा होण्यावर नियंत्रण ठेवते.

( हे ही वाचा: Immunity Booster: रोज सकाळी ‘ही’ कामे करा, अनेक आजार जवळ देखील येणार नाहीत)

ब्लूबेरी खा

ब्लूबेरी अँटीऑक्सिडंट्सचा उत्कृष्ट स्त्रोत आहे. यामुळे यकृत निरोगी राहण्यास मदत होते. नाश्त्यात तुम्ही ब्लूबेरी खाऊ शकता. यासोबत तुम्ही फ्रोझन ब्लूबेरीज खाऊ शकता किंवा स्मूदी आणि दही इत्यादींमध्ये घालून खाऊ शकता.

आले चहा

शरीर डिटॉक्स करण्याचा सर्वात सोपा आणि नैसर्गिक मार्ग म्हणजे आल्याचा चहा घेणे. तुम्ही दिवसातून २ ते ३ कप आल्याचा चहा पिऊ शकता. याने तुमचे रक्त शुद्ध होण्यास मदत होईल. तसंच तुम्ही ताजेतवाने देखील राहाल.

( हे ही वाचा: तुमची नखेही निळी होत आहेत का? हे गंभीर फुफ्फुस-हृदय रोगाच लक्षणं असू शकत, वेळीच सावध व्हा)

मासे खा

प्रथिने आणि ओमेगा ३ फॅटी ऍसिड आणि अँटिऑक्सिडंटने भरपूर अशा निरोगी चरबीयुक्त माशांचे सेवन केल्याने यकृत आणि मूत्रपिंड दोन्ही निरोगी ठेवण्यास मदत करतात. मात्र, त्यांचे जास्त प्रमाणात सेवन करणे टाळा. नाहीतर आरोग्य संबंधित समस्या उद्भवू शकतात.