उच्च रक्तदाब (High BP) म्हणजेच Hypertension ही आजच्या काळात झपाट्याने वाढणारी समस्या आहे. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधांसोबत आहाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. शरीराला ताकद देण्यासाठी अनेकजण बदाम, काजू, किशमिश, अंजीर यांसारखे सूका मेवा म्हणजेच ड्राय फ्रूट्स खातात. मात्र सर्वच ड्राय फ्रूट्स रक्दादाबाता त्रास असलेल्या रुग्णांसाठी सुरक्षित असतात असे नाही. काहींसाठी सूका मेवा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात, तर काही उलट त्रास वाढवू शकतात.

ठाण्यातील KIMS Hospitals येथील चीफ डाएटिशियन Amreen Shaikh यांच्या मते, योग्य प्रमाण आणि योग्य प्रकार निवडणे अत्यंत आवश्यक आहे.

रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर ड्राय फ्रूट्स (Best Dry Fruits for BP Control)

तज्ज्ञांच्या मते, काही ड्राय फ्रूट्समध्ये हेल्दी फॅट्स, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

  • १) बदाम (Almonds)

बदामामध्ये अनसॅच्युरेटेड फॅट्स (Unsaturated fats) आणि मॅग्नेशियम असते, जे रक्तवाहिन्यांना रिलॅक्स करण्यास मदत करते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.

  • २) अक्रोड (Walnuts)

अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असते. हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि हृदय मजबूत ठेवण्यास मदत करते.

  • ३) पिस्ता (Pistachios)

पिस्तामध्ये पोटॅशियम आणि हेल्दी फॅट्स असतात, जे रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करू शकतात.

  • ४) मणूके (Raisins)

मणूक्यांमध्ये नैसर्गिक पोटॅशियम असते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकते.

  • ५) जर्दाळू (Dried Apricots)

जर्दाळू पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे, ज्यामुळे रक्तदाब संतुलित राहण्यास मदत मिळू शकते.

रक्तदाब असलेल्या रुग्णांनी टाळावेत असे ड्राय फ्रूट्स (Dry Fruits to Avoid in High BP)

काही ड्राय फ्रूट्समध्ये सोडियम किंवा अतिरिक्त साखर जास्त प्रमाणात असते. हे घटक रक्तदाब वाढवू शकतात.

  • १) मीठ लावलेले ड्राय फ्रूट्स (Salted Nuts)

नमकीन काजू, बदाम किंवा पिस्ता यामध्ये सोडियम जास्त असतो. सोडियम जास्त घेतल्यास रक्तदाब वाढण्याचा धोका वाढतो.

  • २) फ्लेवर किंवा प्रोसेस्ड ड्राय फ्रूट्स (Flavoured/Processed Nuts)

हनी-रोस्टेड, चिली फ्लेवर किंवा मसालेदार ड्राय फ्रूट्समध्ये लपलेली साखर आणि मीठ असते.

  • ३) जास्त काजू (Excess Cashews)

काजूमध्ये फॅट जास्त प्रमाणात असते. जास्त प्रमाणात खाल्ल्यास वजन वाढू शकते, ज्याचा थेट परिणाम रक्तदाबावर होऊ शकतो.

  • ४) साखर लावलेले सुके फळ (Sugar-Coated Dry Fruits)

मीठ किंवा साखर लावलेली किशमिश, टुट्टी-फ्रुट्टी यांसारख्या पदार्थांमध्ये साखर जास्त असते.

ड्राय फ्रूटमधील नैसर्गिक साखर असते जास्त (Natural Sugar in Dry Fruits)

ड्राय फ्रूट्समध्ये नैसर्गिक साखरेची पातळी जास्त प्रमाणात असते. विशेषतः ज्यांना मधुमेह किंवा मेटाबॉलिक समस्या आहेत, त्यांनी काळजीपूर्वक सेवन करणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, ड्राय फ्रूट्स रिकाम्या पोटी खाण्याऐवजी जेवणानंतर किंवा इतर नट्ससोबत खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्याचा धोका कमी होतो.

ड्राय फ्रूट्समुळे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रण शक्य आहे का? (Can Dry Fruits Control BP and Cholesterol?)

योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकार निवडून ड्राय फ्रूट्स खाल्ल्यास हृदयाच्या आरोग्यास फायदा होऊ शकतो.
विशेषतः बदाम आणि अक्रोडमध्ये असलेले हेल्दी फॅट्स कालांतराने कोलेस्ट्रॉल सुधारण्यास मदत करतात. तसेच पोटॅशियमयुक्त ड्राय फ्रूट्स रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास सहाय्यक ठरू शकतात.

दररोज किती प्रमाण योग्य? (Recommended Daily Quantity)

तज्ज्ञांच्या मते:

  • दररोज ५ ते १० नट्स किंवा
  • १ ते २ टेबलस्पून ड्राय फ्रूट्स

हे प्रमाण सुरक्षित मानले जाते. यापेक्षा जास्त प्रमाणात सेवन केल्यास शरीरात अतिरिक्त कॅलरी जमा होऊन वजन वाढू शकते. वाढलेले वजन हे हृदयविकार आणि रक्तदाबासाठी मोठा धोका ठरू शकते.

टीप – वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.