Control Blood Pressure Naturally: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या सामान्य झाली आहे. अनेक जण औषधांवर अवलंबून राहतात; तर काही जण नैसर्गिक उपाय शोधत असतात. पण, तुम्हाला माहीत आहे का? तुमच्या स्वतःच्या स्वयंपाकघरात असा एक साधा पदार्थ आहे, जो योग्य पद्धतीनं खाल्ल्यास आरोग्यावर सकारात्मक परिणाम करू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जाते.

विशेष म्हणजे हा पदार्थ सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास त्याचा परिणाम अधिक प्रभावी ठरू शकतो, असं काही संशोधनांमधून सुचवलं जातं. मात्र, हा नेमका पदार्थ कोणता? आणि त्याचे शरीरावर काय परिणाम होऊ शकतात? चला, यामागचं सत्य जाणून घेऊया…

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत

या पदार्थामध्ये नैसर्गिकरीत्या आढळणारे काही सक्रिय घटक शरीराला संसर्गांपासून संरक्षण देण्यास मदत करू शकतात. नियमित सेवनामुळे सर्दी, खोकला किंवा हंगामी आजारांचा धोका कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होण्यास हातभार लागू शकतो.

Award Banner

पचन सुधारण्यास होऊ शकते मदत

अनेकांना अपचन, गॅस किंवा पोट फुगल्याची समस्या सतावत असते. हा पदार्थ पचनसंस्थेला चालना देण्यास मदत करू शकतो. आतड्यांतील चांगल्या जीवाणूंची वाढ होण्यास मदत होऊन पचनक्रिया सुधारण्याची शक्यता आहे.

रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण?

काही अभ्यासांनुसार, या पदार्थामुळे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होऊ शकते. तसेच रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही साह्य मिळू शकतं. या पदार्थाचं दीर्घकाळ नियमितपणे सेवन केल्यास हृदयाच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जाते.

वजन नियंत्रणात मदत

हा पदार्थ शरीरातील चयापचय (मेटाबॉलिझम) सुधारण्यास मदत करू शकतो. त्यामुळे अनावश्यक भूक कमी होऊन, वजन नियंत्रणात ठेवण्यास साह्य मिळू शकतं. योग्य आहार आणि व्यायामासोबत हा उपाय उपयुक्त ठरू शकतो.

पण, काही गोष्टींची काळजी घ्या

जरी या पदार्थाचे अनेक फायदे सांगितले जात असले तरी काहींना त्याचे दुष्परिणामही जाणवू शकतात :

  • आम्लपित्त किंवा जळजळ होऊ शकते
  • तोंडाला तीव्र वास येऊ शकतो
  • जास्त प्रमाणात घेतल्यास पोटात त्रास होऊ शकतो
  • शरीराला वास येण्याची शक्यता

ज्यांची पचनसंस्था संवेदनशील आहे, त्यांनी कमी प्रमाणात सुरुवात करावी किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

हा पदार्थ नेमका कोणता?

तुम्ही आतापर्यंत ज्या ‘चमत्कारी’ पदार्थाबद्दल वाचत होता, तो म्हणजे लसूण! होय, रोज सकाळी कच्च्या लसणाच्या एक-दोन पाकळ्या खाल्ल्यास वरीलप्रमाणे काही फायदे होऊ शकतात, अशी शक्यता अभ्यासांमधून व्यक्त केली जाते.

(टीप : ही माहिती सामान्य स्वरूपाची असून, वैद्यकीय सल्ल्याला पर्याय नाही. वरील माहितीत नमूद केलेल्या पदार्थाचा प्रत्येकाच्या शरीरावर होणारा परिणाम वेगवेगळा असू शकतो.)