नवी दिल्ली : तंतुमय पदार्थ मुबलक प्रमाणात असलेले खाद्यपदार्थ पोटाच्या आरोग्यासाठी उपयुक्त समजण्यात येतात. तसेच ते मधुमेह, बद्धकोष्ठता आदी व्याधींपासून मुक्ती देण्यासाठीही मदत करतात; पण नव्या संशोधनानुसार अशा पदार्थामुळे मानसिक आरोग्यही सुधारते, असे स्पष्ट झाले आहे. आहारतज्ज्ञही याच कारणामुळे अशा खाद्यपदार्थाचे आहारातील प्रमाण वाढवण्याचा सल्ला देतात.

भूक आणि रक्तातील शर्करा नियंत्रणात ठेवण्यासाठी तंतुमय पदार्थ फायदेशीर आहे. चांगल्या आरोग्यासाठी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंतच्या प्रत्येक व्यक्तीला दररोज २५ ते ३० ग्राम फायबरची आवश्यकता असते; परंतु बहुसंख्य लोक अवघ्या १५ ग्राम तंतुमय पदार्थाचा आहारात समावेश करतात, असे दिसून आले आहे.

Clean Intestine In 20 Minutes In Morning With These Simple Five Asanas How Much Luke Warm Water To Drink First After Waking Up
Video: सकाळी उठताच १५ मिनिटांत पोट स्वच्छ होण्यासाठी करा ‘या’ पाच कृती; कोमट पाणी पिण्याचं प्रमाणही पाहा
ambadichi bhaji recipe in marathi bhaji recipe in marathi
गावाकडील पारंपरिक पोटली पद्धतीची चविष्ट अंबाडीची भाजी; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
People with diabetes Can Eat roasted or baked snacks Is this safe for blood sugar patients Need To Know What To Eat
मधुमेही रुग्णांनी ‘या’ पदार्थाचे सेवन केल्यास नियंत्रित राहील रक्तातील साखर; वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
parental anxiety parents concern about drug addict children
अधोविश्व : अमली पदार्थांमुळे पालकांमध्ये चिंता

‘हावर्ड हेल्थ’च्या संशोधनानुसार तंतुमय पदार्थाचा अधिक आहारात समावेश केला तर स्मृतिभ्रंश व्याधीचा धोका कमी होऊ शकतो. या संशोधनात ४० ते ६४ या वयोगटांतील ३ हजार ७०० जणांचा समावेश करण्यात आला होता. तब्बल १६ वर्षे या लोकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात आले होते. त्या वेळी वरील निष्कर्ष काढण्यात आले.