Eating Rice Causes Weight Gain: भात हा लाखो लोक दुपारच्या जेवणात आणि रात्रीच्या जेवणात आवडीने खातात. बरेच लोक दिवसातून फक्त एकदाच भात खातात, तर बरेच लोक दिवसातून दोन किंवा त्याहून अधिक वेळा खातात. अलिकडच्या काळात लठ्ठपणा वेगाने वाढत असल्याने लोक अनेकदा भाताला दोष देतात आणि वजन कमी करण्यासाठी भात खाणे थांबवण्याचा निर्णय घेतात. ही चर्चा प्रामुख्याने शहरी भागात, सोशल मीडियावर आणि कमी शारीरिक हालचाली आणि प्रक्रिया केलेले अन्न जास्त खाणाऱ्या लोकांमध्ये होताना दिसते.

पोषण तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, वजन वाढणे केवळ भातावर अवलंबून नाही तर एकूण कॅलरीज सेवन, जीवनशैली आणि अन्न सेवन यावर देखील अवलंबून असते. साधारणपणे लोकांना प्रश्न पडतो की दिवसातून दोनदा भात खाणे योग्य आहे का आणि किती प्रमाणात भात खाणे योग्य आहे.

दिवसातून दोनदा भात खाणे किती सामान्य आहे?

आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वांनुसार, तांदूळ हे कार्बोहायड्रेटयुक्त धान्य आहे जे जगातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्येसाठी एक प्रमुख अन्न आहे. दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी जेवणात ते समाविष्ट केले जाऊ शकते.

सरासरी १०० ग्रॅम कच्च्या पांढऱ्या तांदळामध्ये ३६० ते ३६५ कॅलरीज असतात. ते प्रामुख्याने कार्बोहायड्रेट्सचे स्रोत आहे आणि ते ऊर्जा प्रदान करतात. जेव्हा शरीर आवश्यकतेपेक्षा जास्त कॅलरीज वापरते आणि त्या बर्न करू शकत नाही तेव्हा लठ्ठपणा येतो. म्हणूनच केवळ तांदूळच नाही तर एकूण आहार आणि शारीरिक हालचाल महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

हेल्थलाइनच्या मते, रिफाइंड कार्बोहायड्रेट्स आणि फायबर कमी असलेल्या आहारामुळे वजन वाढण्याचा धोका वाढतो. तसंच प्रत्येकाने संतुलित प्रमाणात कार्बोहायड्रेट्सचे सेवन करणे महत्त्वाचे आहे.

USDA/मयप्लेट आहार मार्गदर्शक तत्वांनुसार, शिजवलेल्या भाताची एक सर्व्हिंग अर्धा कप मानली जाते. त्यामध्ये १५०-२०० कॅलरीज असतात. काही मार्गदर्शक तत्वांमध्ये ९०-१८० ग्रॅम असे सुचवले आहे. म्हणून १२५ ग्रॅम हे सर्वात सामान्य सर्व्हिंग मानले जाते.

गुडआरएक्सच्या मते, प्रौढांसाठी तांदूळ अर्धा कप म्हणजे १०० ग्रॅम शिजवलेला भात किंवा सुमारे एक चतुर्थांश कर कोरडा भात खाण्याचा सल्ला दिला जातो. भाताचे प्रमाण कमी-जास्त होते, कारण व्यक्तीनुसार ते बदलते. अमेरिकन हार्ट असोसिएशनने प्रौढांना दररोज ३ ते ६ सर्व्हिंग खाण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये भाताचा समावेश असू शकतो.

काही लोकांसाठी दररोज ६पेक्षा जास्त सर्व्हिंग (६०० ग्रॅम शिजवलेला भात) भात खाणे जास्त असू शकते. तर काहींना वय, शरीराचा प्रकार आणि शारीरिक हालचालींनुसार जास्त प्रमाणात धान्याची आवश्यकता असू शकते. ज्यांचे प्रमुख अन्न भात आहे ते सहसा दिवसातून सहा वेळा शिजवलेला भात खातात, त्यासोबत मसूर, भाज्या याचा समावेश करणे गरजेचे आहे.

लठ्ठपणा भातामुळे नाही, तर अतिसेवनाने होतो…

Pathkindlabsच्या मते, फक्त भात खाल्ल्याने कधीही लठ्ठपणा येत नाही, जास्त खाल्ल्याने तुमचे वजन कमी होते. जर तुमची रोजची कॅलरीजची आवश्यकता १८००-२०००च्या दरम्यान असेल आणि तुम्ही तेलकट पदार्थ, साखरेचे पेय आणि स्न्रॅक्ससह भाताचे मोठे सर्व्हिंग खात असाल तर एकदा नाही तर दोनदा भात खाल्ल्यानंतरही तुमचे वजन वाढू लागेल.

त्याच वेळी, जर तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्रिय असाल, भातासोबत प्रोटीनयुक्त पदार्थ खात असाल, फायबर योग्य प्रमाणात घेत असाल, तर मध्यम प्रमाणात भात वजन वाढवणार नाही.

भात खाण्याची योग्य पद्धत कोणती?

तज्ज्ञांच्या मते, जर कोणी पांढऱ्या तांदळाऐवजी तपकिरी तांदूळ खाल्ले तर त्याला जास्त फायबर मिळेल आणि सूक्ष्म पोषक घटक थोडे वाढतील. त्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले वाटते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण काही प्रमाणात कमी होऊ शकते.

एका पोषणपूर्ण ताटात अर्ध्या भाज्या आणि सॅलड, एक चतुर्थांश प्रोटीन आणि उर्वरित चतुर्थांश कार्बोहायड्रेट्स म्हणझेच भात, चपाती किंवा भाकरी असावी. दररोज ३० ते ४५ मिनिटे शारीरिक हालचालींसह, दुपारच्या जेवणासाठी आणि रात्रीच्या जेवणासाठी अर्धा कप शिजवलेला भात बहुतेक निरोगी लोकांसाठी सुरक्षित मानला जातो.