Soaked Walnuts for 15 Days Body Changes and Health Benefits: आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपण अनेक उपाय करतो; पण काही साधे आणि घरगुती उपाय इतके प्रभावी असतात की, त्यांचे परिणाम पाहून आश्चर्य वाटते. डॉक्टर नेहमीच आहारात सुका मेवा समाविष्ट करण्याचा सल्ला देतात. त्यात अक्रोड (अखरोट) हा एक अत्यंत गुणकारी सुका मेवा मानला जातो. मात्र, तो कसा खावा याबाबत अनेकांना योग्य माहिती नसते. बहुतेक जण अक्रोड सरळ खातात; पण तो भिजवून खाल्ल्यास त्याचे फायदे अनेक पटींनी वाढतात, हे फार कमी लोकांना माहीत आहे. जर तुम्ही सलग १५ दिवस अक्रोड भिजवून खाल्ला, तर शरीरात नेमके कोणते बदल घडतात? चला, जाणून घेऊया हा आश्चर्यचकित करणारा परिणाम…

१. पचनक्रियेत लक्षणीय सुधारणा

अक्रोड भिजवल्यावर तो मऊ होतो आणि पचायला अत्यंत सोपा बनतो. अनेकांना अपचन, गॅस किंवा पोट फुगण्याची समस्या त्रास देते. अशा परिस्थितीत भिजवलेला अक्रोड खाणे फायदेशीर ठरते. नियमित १५ दिवस भिजवलेल्या अक्रोडाचे सेवन केल्यास पोट हलके वाटू लागते आणि पचनक्रिया सुधारते. सकाळी रिकाम्या पोटी त्याचे सेवन केल्यास याचा अधिक चांगला परिणाम जाणवतो.

२. दिवसभर टिकणारी ऊर्जा

अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड, प्रथिने आणि व्हिटॅमिन बी हे घटक भरपूर प्रमाणात असतात. हे सर्व घटक शरीराला नैसर्गिक ऊर्जा देतात. अक्रोडाचे सतत १५ दिवस सेवन केल्यास तुम्हाला दिवसभर ताजेतवाने आणि ऊर्जावान झाल्याचा अनुभव येतो. विशेषतः सकाळी अक्रोड खाल्ल्यास दिवसभराची काम करण्याची क्षमता वाढते.

३. मेंदूची कार्यक्षमता वाढते

अक्रोडला ‘ब्रेन फूड’, असेही म्हटले जाते. त्यात असलेले ओमेगा-३ मेंदूच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. त्यामुळे स्मरणशक्ती सुधारते, एकाग्रता वाढते आणि मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते. सलग १५ दिवस अक्रोड खाल्ल्यास मानसिक आरोग्यात सकारात्मक बदल जाणवू शकतो.

४. हृदयासाठी फायदेशीर

अक्रोड हृदयाच्या आरोग्यासाठीही लाभदायक मानला जातो. तो शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. अक्रोडाचे १५ दिवस नियमित सेवन केल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि हृदय अधिक मजबूत होते.

५. त्वचा आणि केसांमध्ये नैसर्गिक चमक

अक्रोडमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. हे घटक त्वचेला आतून पोषण देतात आणि त्वचेचे नैसर्गिक तेज वाढवतात. १५ दिवस नियमित सेवन केल्यास चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसू लागते. तसेच केस अधिक मजबूत, मऊ आणि चमकदार होतात.

पण लक्षात ठेवा…

अक्रोडाचे फायदे मिळवण्यासाठी त्याचे योग्य प्रमाणात सेवन करणे गरजेचे आहे. दररोज दोन ते चार भिजवलेले अक्रोड खाणे पुरेसे असते; मात्र अति प्रमाणात सेवन केल्यास विपरीत परिणाम होऊ शकतो.

शेवटी एकच प्रश्न… तुम्हीही आजपासून १५ दिवस हा सोपा उपाय करून पाहणार का? कदाचित तुमच्या शरीरातही असेच आश्चर्यकारक बदल दिसून येतील.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)