scorecardresearch

Premium

Loss Weight : ‘या’ 5 भाज्या कच्चा खालल्याने घटू शकते वजन, पाचनतंत्रही व्यवस्थीत राहील

हिरव्या भाज्या खाल्ल्याने शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतात. त्यांचे सेवन केल्याने शरीर निरोगी राहते. भाज्यांचे सेवन डोळ्यांसाठी तसेच एकंदर आरोग्यासाठी उपयुक्त आहे.

raw vegetables and weight loss
(संग्रहीत छायाचित्र)

भाज्या या शरीराचे आरोग्य चांगले ठेवतात. यातून आपल्या विविध जिवनसत्वे आणि प्रथिने मिळतात. त्यांच्या सेवनाने रोग प्रतिकारक शक्ती देखील वाढते. हिरव्या भाज्यांमध्ये विरघळणारे फायबर, लोह, खनिजे आणि कॅल्शियम असते, ज्यामुळे शरीर निरोगी होते. भाज्यांचे सेवन केल्याने मुत्रपिंडात आम्ल जमा होत नाही. हिरव्या भाज्या खाल्ल्याने शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतात. त्यांचे सेवन केल्याने शरीर निरोगी राहते. भाज्यांचे सेवन डोळ्यांसाठी तसेच एकंदर आरोग्यासाठी उपयुक्त आहे.

मात्र काही भाज्या अशा असतात ज्या कच्च्या खाल्ल्या तर त्या आरोग्याला अनेक फायदे होतात. गाजर, टोमॅटो, काकडी, कांदा आणि लसूण या अशा भाज्या आहेत ज्या थेट खाल्ल्या तर अनेक आजारांवर उपचार होऊ शकतो. या भाज्यांच्या सेवनाने लठ्ठपणावर नियंत्रण ठेवता येते. चला जाणून घेऊया या भाज्या कच्च्या खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतात.

why high blood sugar and blood pressure are a risky mix here what you need to check what doctor said read
उच्च रक्तदाबासह मधुमेह असल्यास सावधान! वेळीच काळजी घ्या अन् डॉक्टरांचे ‘हे’ उपाय करा फॉलो
5 Fat burner superfoods in your kitchen
किचनमधील ‘हे’ चार मसाल्यांचे पदार्थ चयापचय क्रिया वाढवण्यासह वजन ठेवतील नियंत्रणात; आताच आहारात करा समावेश
how to get rid of ants in the house quickly home remedies to get rid from ants
घरातील लाल मुंग्या घालवण्यासाठी अतिशय उपयुक्त असे ४ घरगुती उपाय; पुन्हा एकही मुंगी दिसणार नाही
terrace garden cultivation field beans kitchen garden
गच्चीवरची बाग: पापडीची लागवड

काकडी वजन कमी करण्यात मदत करते

कच्च्या काकडीचे सेवन केल्याने शरीर हायड्रेट राहते आणि वजन नियंत्रणात राहते. वाढत्या वजनाचा त्रास होत असाल तर काकडी कच्ची खा. कच्च्या काकडीत 80 टक्के पाणी असते. हे शरीरातील अंतर्गत अवयव आणि त्वचा खोलवर स्वच्छ करते. काकडीचे सेवन केल्याने हृदयाचे आरोग्यही सुधारते.

गाजर डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवते

कच्च्या भाज्या खाल्ल्याने पचनास मदत होते. कच्च्या भाज्यांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे चांगल्या प्रमाणात असतात. त्यांचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. जर तुम्ही गाजर कच्चे सेवन केले तर तुमचे आरोग्य चांगले राहील. गाजर यकृत आणि डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवते.

टोमॅटोने मधुमेह दूर होण्यास मदत होत

कच्चा टोमॅटो खाल्ल्याने मधुमेह, डोळे आणि लघवीचे आजार, बद्धकोष्ठता आणि त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होते. टोमॅटो पचनास मदत करतो.

कच्चा कांदा खाल्ल्याने लैंगिक आरोग्य सुधारते

कच्च्या कांद्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि मधुमेह नियंत्रित होतो. कच्चा कांदा तोंडाच्या आरोग्याचीही काळजी घेतो. कच्चा कांदा हाडांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कच्चा कांदा खाल्ल्याने खोकला बरा होतो. याचे सेवन केल्याने लैंगिक आरोग्य सुधारते.

लसणाच्या पाकळ्या खालल्याने कफपासून आराम मिळतो

लसणाच्या पाकळ्या खाल्ल्याने सर्दी, खोकला आणि कफ यापासून आराम मिळतो. हे घसा आणि पोटाच्या आजारांवर उपचार करते. लसूण कच्चा खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Eating these 5 vegetables raw could help in weight loss ssb

First published on: 06-09-2022 at 18:56 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×