scorecardresearch

लसूण जास्त खात असाल तर सावध व्हा; आरोग्याचं होऊ शकतं ‘हे’ नुकसान

लसूण जास्त प्रमाणात खाल्ल्याने तुमचा रक्तदाब कमी होऊ शकतो.

lifestyle
लसूण आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो.(photo: file photo)

लसूण हा गुणधर्मांचा खजिना आहे आणि तो आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. यामध्ये कॅल्शियम, तांबे, पोटॅशियम, फॉस्फरस, लोह आणि व्हिटॅमिन बी १ सारख्या पोषक तत्वांचा समावेश आहे. हे अन्नाची चव अनेक पटींनी वाढवतेच शिवाय रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवते आणि आरोग्याला अनेक फायदे देते.

आता लसणाचा वापर केवळ देसी फूडमध्येच नाही तर अनेक प्रकारच्या फास्ट फूडमध्येही केला जात आहे. पण अनेक वेळा त्याचे फायदे आणि त्याचा गरम परिणाम पाहून लोकं त्याचे मोठ्या प्रमाणात सेवन करू लागतात, विशेषतः हिवाळ्यात. दरम्यान ज्यांना लसणाचे फायदे माहित आहेत ते लसणाचे जास्त सेवन करतात. मात्र आहारात लसणाचा अधिक सेवन केल्याने त्याचा फायदा होण्याऐवजी शरीराला नुकसानही होऊ शकतो. लसूण तुम्हाला कसे हानी पोहोचवू शकते ते जाणून घ्या.

रक्तदाब कमी होऊ शकतो

लसूण जास्त प्रमाणात खाल्ल्याने तुमचा रक्तदाब कमी होऊ शकतो. ज्यांना आधीच कमी रक्तदाबाची समस्या आहे, त्यांनी लसूण जास्त प्रमाणात खाऊ नये.

आलिया भट्टप्रमाणेच घ्या तुमच्या त्वचेची खास काळजी, जाणून घ्या काय आहे तिच्या चमकदार त्वचेचं रहस्य

तोंडाला आणि घामाला दुर्गंधी येऊ शकतो

लसणामुळे अन्नाची चव चांगली येते पण त्याचा वास खूप तिखट असतो. याचे जास्त सेवन केल्याने तोंडात दुर्गंधी येऊ शकतो. इतकेच नाही तर कधी कधी घामातून आणखी दुर्गंधी येऊ लागते. त्यामुळे ज्यांना आधीच तोंडातून दुर्गंधी येण्याची किंवा काही कारणाने घाम येण्याची समस्या आहे, त्यांनी लसूण जास्त खाऊ नये.

छातीत जळजळण्याची समस्या निर्माण होऊ शकते

लसणात अॅसिड असते, त्यामुळे लसणाचे जास्त सेवन केल्याने छातीत जळजळ होऊ शकते. ज्या लोकांना आधीच अॅसिडिटीचा त्रास आहे, अशा लोकांनी लसणाचे जास्त सेवन टाळावे.

(टीप: वरील टिप्सचा वापर करताना क्षेत्रातील तज्ञांचा व फॅमिली डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Eating too much garlic can damage the body scsm

ताज्या बातम्या