तुम्ही दररोज टोमॅटो केचअपचे सेवन करताय? तर ‘या’ समस्या निर्माण होतील, कसे ते जाणून घ्या ?

जास्त प्रमाणात केचअपचे सेवन केल्यास त्याचा वाईट परिणाम तुमच्या शरीराला व आरोग्याला होऊ शकतो.

lifestyle
जास्त केचअपचे अधिक सेवन केल्यास ते आरोग्यासाठी हानिकारक आहे. ( photo credit: Pixabay)

बहुतेक लोकांना प्रत्येक गोष्टीसोबत टोमॅटो केचअप खाण्याची खूप सवय असते. त्यात आपण पाहिलं तर केचअप खाण्याची सवय फक्त मुलांमध्येच नाही तर सर्व वयोगटातील लोकांमध्ये आहे. त्यांना ब्रेक, पकोडा, मॅगी, पिझ्झा किंवा बर्गर, पास्ता, सगळ्यांसोबत केचअप खाण्याची सवय असते. परंतु, आपल्याला हे माहित असले पाहिजे की जास्त प्रमाणात काहीही खाल्ल्याने आरोग्याला खूप त्रास तसेच अनेक समस्या निर्माण होत असतात. तुम्ही जर जास्त केचअप खात असाल तर ते आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. एचटीच्या बातमीनुसार, केचअपमध्ये ना प्रोटीन असते, ना फायबर त्याऐवजी तुमच्या आरोग्यासाठी यामध्ये हानिकारक पदार्थ जास्त असतात. केचपमध्ये साखर, मीठ, विविध मसाले आणि फ्रुक्टोज कॉर्न सिरपचा वापर केला जातो, जे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. त्याचे अनेक दुष्परिणामसुद्धा होऊ शकतात.

केचअपचे साईड इफेक्ट्स

पोषक तत्वांचा अभाव

तुम्ही टोमॅटोचा केचअप जास्त प्रमाणात खात असाल तर हे माहीत असणे देखील आवश्यक आहे की, टोमॅटोमध्ये जास्त पोषक घटक आढळत नाहीत. तसेच त्यात प्रथिने आणि फायबर देखील नसतात. त्यामुळे जास्त केचअप आरोग्यासाठी हानिकारक आहे.

हृदयरोग

टोमॅटोमध्ये फ्रुक्टोजचे प्रमाण जास्त असते. ज्याने ट्रायग्लिसराइड्स नावाचे रसायन जास्त प्रमाणात तयार करते. त्यामुळे हे रसायन तुमच्या हृदयासाठी अनेक समस्या निर्माण करू शकतात.

लठ्ठपणा

केचपमध्ये जास्त फ्रुक्टोज असल्याने ते लठ्ठपणा वाढवते आणि इन्सुलिनचे प्रमाणही कमी करते.

अ‍ॅसिडिटी

टोमॅटो केचअप हा काही प्रमाणात आंबटपणा असतो. त्यात तुम्ही या केचअपचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास अ‍ॅसिडिटी आणि छातीत जळजळ होण्याची समस्या निर्माण होतात. तसेच पचनसंस्था बिघडते.

सांधेदुखी

कोणत्याही प्रकारचे प्रक्रिया केलेले तसेच काही दिवस आधी तयार केले अन्नाचे सेवन केल्यास छातीत जळजळ होण्याची शक्यता असते. तसेच सांधेदुखीची ही समस्या वाढू शकते.

किडनीची समस्या

जास्त केचअपचे सेवन केल्याने लघवीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण वाढते. यामुळे तुम्हाला किडनी स्टोनची समस्या होऊ शकते.

एलर्जी

तुम्ही खात असलेल्या केचअपमध्ये हिस्टामाईन्स रसायनाचे प्रमाण जास्त असते. हिस्टामाईन्समुळे अनेक लोकांना एलर्जीची समस्या निर्माण होत असते. यामुळे शिंका येणे आणि श्वासोच्छवासाच्या समस्या यासारख्या एलर्जीक प्रतिक्रिया देखील होऊ शकतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Eating too much tomato ketchup can lead to heart kidney and obesity problems scsm