Prevent Urine Infection : वैद्यकीय अहवालानुसार, बहुतेक लोकांना आयुष्यात कधी ना कधी यूटीआय होतो. मात्र, काही लोकांना ही समस्या वारंवार सतावते. ६ महिन्यांत २ किंवा त्यापेक्षा जास्त वेळा इन्फेक्शन झाल्यास त्याला ‘रिकरंट यूटीआय’ (Recurrent UTI) म्हणतात. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये मूत्रमार्ग (Urethra) लहान असल्याने त्यांना हा त्रास जास्त होतो. याशिवाय वृद्ध, मधुमेह (डायबिटीज) असलेले रुग्ण आणि गरोदर महिलांमध्ये याचा धोका जास्त असतो.

यूटीआय का होतो?

‘ई. कोलाय’ (E. coli) नावाच्या बॅक्टेरियामुळे सुमारे ८० ते ९० टक्के इन्फेक्शन होते. हा बॅक्टेरिया आतील अवयवांमधून मूत्रमार्गात पोहोचल्यास संसर्ग पसरवतो.

वारंवार इन्फेक्शन होण्याची प्रमुख कारणे:

मी पाणी पिणे: पुरेसे पाणी न प्यायल्याने आणि वेळच्या वेळी लघवी न केल्याने बॅक्टेरिया मूत्राशयातच राहतात. दिवसातून किमान २ ते ३ लीटर पाणी पिणे आवश्यक आहे.

हाय ब्लड शुगर (डायबिटीज): रक्तात आणि लघवीत साखरेचे प्रमाण वाढल्याने बॅक्टेरिया वेगाने वाढतात. तसेच रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यामुळे वारंवार यूटीआय होतो.

वैयक्तिक स्वच्छता: अस्वच्छ किंवा ओले कपडे वापरल्याने संसर्ग वाढतो.

किडनी स्टोन आणि प्रोस्टेट: वाढलेले प्रोस्टेट, किडनी स्टोन किंवा मज्जासंस्थेच्या आजारांमुळे मूत्राशय पूर्ण रिकामे होत नाही.

हॉर्मोनल बदल: रजोनिवृत्तीनंतर (Menopause) एस्ट्रोजन हॉर्मोन कमी झाल्याने नैसर्गिक संरक्षण कमकुवत होते.

शारीरिक संबंध: लैंगिक संबंधांनंतरही बॅक्टेरिया मूत्रमार्गात प्रवेश करू शकतात.

मूत्रमार्गाच्या संसर्गाचा धोका टाळण्यासाठी उपाय

१) भरपूर पाणी आणि द्रवपदार्थ प्या. यामुळे लघवीचे प्रमाण वाढते, ज्यामुळे शरीरातील जीवाणू बाहेर टाकण्यास मदत होते.
२) लैंगिक अवयवांच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या.
३) लैंगिक संबंधानंतर लघवी करा, यामुळे जिवाणूंची वाढ रोखण्यास मदत होऊ शकते.
४) सार्वजनिक शौचालयांचा वापर टाळा, कारण येथेच संसर्ग पसरण्याचा धोका सर्वाधिक असतो.