scorecardresearch

Hair care: केसगळतीमुळे त्रस्त आहात? तर कोरफड ठरेल रामबाण उपाय, जाणून घ्या

तुम्ही केस गळण्याने त्रस्त असाल आणि सर्व प्रकारचे उपाय करून थकले असाल तर तुमच्या केसांवर कोरफडीचा वापर करा. केस गळती रोखण्यासाठी कोरफड खूप प्रभावी आहे.

कोरफडमध्ये ९६ टक्के पाणी असते जे केसांच्या वाढीस चालना देते. (photo credit: jansatta)

केस गळणे ही समस्या लोकांना वारंवार भेडसावत असते. केसगळती नियंत्रित करण्यासाठी लोकं विविध प्रकारचे शॅम्पू, कंडिशनर आणि कॉस्मेटिक उत्पादने वापरतात, तरीही ही समस्या सुटत नाही. जर तुम्ही केस गळण्याने त्रस्त असाल आणि सर्व प्रकारचे उपाय करून थकले असाल तर तुमच्या केसांवर कोरफडीचा वापर करा. केस गळती रोखण्यासाठी कोरफड खूप प्रभावी आहे.

कोरफडीमध्ये असलेले व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी हे गुणधर्म तुमच्या केसांना पोषण देते आणि केस मजबूत करते. कोरफडमध्ये ९६ टक्के पाणी असते जे केसांच्या वाढीस चालना देते. कोरफडीमुळे केस मुळांपासून मजबूत होतात, तसेच याचा वापर केल्याने कोंडा दूर होतो. केसांवर कोरफडीचा वापर केल्याने रक्ताभिसरण सुधारते. तर केसगळती रोखण्यासाठी केसांवर कोरफडीचा वापर कसा करावा हे जाणून घेऊया.

एका वाटीत कोरफडीचा गर काढून घ्या आणि त्यात नारळाचे तेल किंवा ऑलिव्ह ऑइल मिक्स करा. आता ही पेस्ट तुमच्या केसांना एक तासभर लावून ठेवा. तासभरानंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा. तुम्ही ही संपूर्ण प्रक्रिया आठवड्यातून २ ते ३ वेळा केल्याने केस गळती कमी होईल.

जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी कोरफड आणि नारळाचे तेल मिक्स केलेली पेस्ट केसांवर लावू शकता आणि सकाळी उठल्यानंतर केस धुवा, असे केल्याने तुम्हाला केसगळतीपासून सुटका मिळेल.

मध, अंड्याचा पांढरा भाग, मेथीची पेस्ट याचा योग्य पद्धतीने वापर केल्याने केस गळण्याची समस्या कमी होण्यास मदत होईल. सर्व गोष्टी एकत्र करून पेस्ट बनवा आणि केसांना लावा आणि केसांना मसाज करा आणि १५ मिनिटे केसांवर राहू द्या. एक तासानंतर केस सौम्य शाम्पूने धुवा, तुम्हाला केसांवर याचा फरक जाणवेल.

केस गळणे कमी करण्यासाठी कांद्याच्या रसात कोरफडीचे जेल मिसळा आणि तासाभराने केसांना शॅम्पू करा, केसगळती कमी होईलच त्याच बरोबर केसांची वाढही होईल.

(टिप: वरील टिप्सचा वापर करताना क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Effective ways to use of aloe vera for hair growth scsm

ताज्या बातम्या