अंड्यांच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते; जाणून घ्या मधुमेहाच्या रुग्णांनी कोणते पदार्थ टाळावे

मधुमेह असलेल्या रुग्णांनी उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ खाणे टाळावे, कारण ते रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतात.

eggs_759
मधुमेही रुग्णांनी मांस, प्रक्रिया केलेले अन्न इत्यादींचा वापर टाळावा. (इंडियन एक्स्प्रेस फाईल फोटो)

आजच्या काळात, लोक खाण्याच्या वाईट सवयी, चुकीची जीवनशैली आणि कोणतीही शारीरिक हालचाल न केल्यामुळे मधुमेहासारख्या आजारांना बळी पडतात. मधुमेह हा एक चयापचय रोग आहे, ज्यामध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला सांगूया की जेव्हा शरीरातील स्वादुपिंड इन्सुलिन हार्मोनचे उत्पादन कमी करते किंवा थांबवते, तेव्हा यामुळे लोक मधुमेहाचे बळी ठरतात. मधुमेही रुग्णांच्या रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रितपणे चढ -उतार करत राहते.

रक्तातील ग्लुकोजची वाढलेली पातळी हृदयविकाराचा झटका, मूत्रपिंड निकामी होणे, अनेक अवयव निकामी होणे आणि ब्रेन स्ट्रोक सारख्या गंभीर आणि जीवघेण्या आजारांचा धोका वाढवते. रक्तातील साखरेची पातळी अन्नाने जास्त प्रभावित होते. अशा परिस्थितीत आरोग्य तज्ञ मधुमेहाच्या रुग्णांना काही गोष्टींचा वापर टाळण्याचा सल्ला देतात.

(हे ही वाचा: आता Apple AirPods Pro तीन वर्षांसाठी मोफत दुरुस्ती किंवा बदलले जाऊ शकणार! जाणून घ्या अधिक तपशील)

अंडी: एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, जी व्यक्ती रोज अंड्याचे सेवन करते, त्यांच्यामध्ये मधुमेहाचा धोका वाढतो. ब्रिटीश जर्नल ऑफ न्यूट्रिशन मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, दररोज एक किंवा अधिक अंडी खाल्ल्याने मधुमेहाचा धोका ६० टक्क्यांनी वाढतो. म्हणूनच आरोग्य तज्ञ मधुमेही रुग्णांना अंडी टाळण्याचा सल्ला देतात.

उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असलेले अन्न: मधुमेह असलेल्या रुग्णांनी उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ खाणे टाळावे. कारण अशा गोष्टी रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढवू शकतात, ज्यामुळे मधुमेही रुग्णांना समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी मांस, प्रक्रिया केलेले अन्न इत्यादींचा वापर टाळावा.

(हे ही वाचा: या ३ राशीच्या लोकांचे नशीब मानले जाते सर्वोत्तम; नसते सुखसोयींमध्ये कमी! )

दारू: दारू आरोग्यासाठी हानिकारकच आहे परंतु मधुमेहाच्या रुग्णांसाठी दारू अधिक घातक ठरू शकते. कारण अल्कोहोल शरीराच्या कार्यक्षमतेवर परिणाम करते. अशा परिस्थितीत मधुमेही रुग्णांनी दारू पिणे टाळावे.

साखरयुक्त अन्न: मधुमेहाच्या रुग्णांनी गोड आणि साखरयुक्त अन्न खाणे टाळावे. कारण या गोष्टी रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम करतात, जे मधुमेही रुग्णांसाठी घातक ठरू शकतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Egg consumption can raise blood sugar levels learn what foods diabetics should avoid ttg

Next Story
स्वच्छ पाणी आणि साबणाने मुलांच्या चालनेत वाढ
ताज्या बातम्या