know right way of eating eggs : अंडी हा अनेकांच्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे. अंड्यांपासून विविध पोषक तत्त्वे मिळतात, त्यामुळे डॉक्टर नेहमी अंडी खाण्याचा सल्ला देतात. अंड्यात असलेले प्रोटिन्स, व्हिटामिन्ससारखे पोषक तत्त्वे शरीराच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे दिवसातून कमीत कमी एक अंडं खावं, असे म्हटले जाते.
प्रत्येक जण त्यांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या पद्धतीने अंडी खातात, पण अंडी खाताना तुम्ही काही चुका करता का? आज आपण त्या विषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत.
- काही लोकं कच्ची अंडी खातात, तर काही लोकं उकडून अंडी खातात. अनेक जण अंड्यांपासून वेगवेगळे पदार्थ बनवून खातात. पण, तुम्हाला माहिती आहे का की अंडी खाण्याची योग्य आणि आरोग्यासाठी फायदेशीर पद्धत कोणती आहे?
हेही वाचा : Onion: कांदा परतून खावा की कच्चा? जाणून घ्या योग्य पद्धत




- अंडी शिजवून खाल्लेली कधीही चांगली असतात. शिजवलेली अंडी पचनास सोयीस्कर असतात आणि यामुळे पचनाशी संबंधित समस्या निर्माण होत नाहीत. कच्च्या अंड्यांमध्ये ५१ टक्के प्रोटिन्स असतात, तर शिजवलेल्या अंड्यांमध्ये ९१ टक्के प्रोटिन्स असतात.
- कच्च्या अंड्यांमध्ये प्रोटिन्स वेगवेगळ्या भागात विभागलेले असतात, पण हीच अंडी जेव्हा शिजवली जातात तेव्हा तापमानामुळे सर्व प्रोटिन्स एकत्र येतात आणि त्यानंतर हे प्रोटिन्स पचायला जड जात नाही.
- अंडी शिजवून खाणे चांगले असले तरी अति प्रमाणात अंडी शिजवल्यामुळे त्यातील पोषक तत्त्वे कमी होतात. एका अभ्यासानुसार शिजवल्यानंतर अंड्यातील व्हिटामिन ए १७ ते २० टक्के कमी होऊ शकतात.
अंडी मायक्रोवेव्हमध्ये ठेवल्यानंतर किंवा उकळल्यानंतर किंवा फ्राय केल्यानंतर त्यातील अँटिऑक्सिडंट्स ६ ते १८ टक्के कमी होऊ शकतात.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)