Empty Stomach Tea Kidney Health : तुम्हीही रिकाम्यापोटी चहा पिता का? आजच ही सवय बदला, किडनीवर होईल असा परिणामसकाळी रिकाम्यापोटी चहा पिणे मुतखडा(किडनी स्टोन) आणि निर्जलीकरणाचा (डिहायड्रेशन) धोका वाढवू शकतो. चहामध्ये उपलब्ध असलेले ऑक्सालेट्स आणि कॅफिन थेट मुत्रपिंडावर(किडनी)च्या रक्त शुद्ध करण्याच्या क्षमतेवर परिणाम करू शकते त्यामुळे आरोग्य तज्ज्ञांच्या मते सकाळी चहा पिण्याआधी नाश्ता करण्याचा सल्ला देतात.
सकाळी उठताच एक कप गरम गरम चहा मिळल्यास दिवसाची सुरुवात चांगली होते असा अनेकांचा समज आहे. भारतात बेड टी क्लचर फार पुर्वीच रुजू झाले आहे पण रिकाम्या पोटी चहा पिण्याची सवय हळू हळू मुत्रपिंडावर परिणाम करू शकते. संशोधनानुसार, चहातील कॅफिन ऑक्सालेट्स रिकाम्या पोटी शरीरात गेल्यास निर्जलीकरण आणि मुत्रपिंड सारख्या समस्यांचा धोका वाढवतात त्यामुळे नेहमी काही तरी खाल्याशिवाय चहा पिऊ नये असा सल्ला दिला जातो. याबाबत मेडिकल रिपोट्स काय सांगतात, जाणून घ्या
किडनीवर कसा पडतो प्रभाव?
ऑक्झॅलेट्स चहामध्ये नैसर्गिकरित्या आढळतात. अशा प्रकारे, जेव्हा एखादी व्यक्ती रिकाम्या पोटी चहा पिते, तेव्हा हे घटक थेट मूत्रपिंडांपर्यंत पोहोचतात. तज्ज्ञांच्या मते, ऑक्झॅलेट्स कॅल्शियमसह संयोग करून स्फटिक तयार करतात, ज्यापासून नंतर किडनी स्टोन निर्माण होतो. याशिवाय, चहा एक मूत्रवर्धक आहे, म्हणजेच चहा हे शरीरातील पाणी बाहेर टाकणारे पेय आहे. रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास शरीरातील पाणी कमी होऊ शकते, ज्यामुळे मूत्रपिंडांना रक्त गाळण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते.
कॅफीन आणि आम्लपित्त (Caffeine and acid reflux)
हेल्थलाइननुसार, चहामध्ये असलेल्या कॅफीनमुळे रिकाम्या पोटी प्यायल्यास रक्तदाब अचानक वाढू शकतो, ज्यामुळे दीर्घकाळात मूत्रपिंड आणि लहान रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ शकते. तसेच, हा चहा आम्लधर्मी असून पोटाच्या खालच्या भागात त्याचे सेवन केल्यास पोटातील पित्तरसात अडथळा येतो, ज्याचा पचनक्रियेवर नकारात्मक परिणाम होतो. चहामध्ये असलेल्या टॅनिनमुळे मळमळ आणि पोटाच्या खालच्या भागात जळजळ होऊ शकते, ज्याचा अप्रत्यक्षपणे मूत्रपिंडाच्या चयापचय क्रियेवर परिणाम होतो.
काळा चहा की दुधाचा चहा, कोणती अधिक धोकादायक?
संशोधनानुसार, जर तुम्हाला आधीपासूनच किडनीचा आजार (CKD) असेल, तर चहाची वेळ खूप महत्त्वाची असते. किडनी न्यूट्रिशन इन्स्टिट्यूटच्या मते, दुधाचा चहा किडनीसाठी किंचित कमी धोकादायक असते. याचे कारण असे आहे की, दुधात असलेले कॅल्शियम पोटात आणि आतड्यांमध्ये चहामधील ऑक्झॅलेट्ससह संयोग पावते. यामुळे ऑक्झॅलेट्स किडनीपर्यंत पोहोचण्यापूर्वीच शरीरातील विषारी पदार्थांसह बाहेर टाकले जातात. अन्नातून किंवा दुग्धजन्य पदार्थांमधून ऑक्झॅलेट्स घेतल्याने किडनी स्टोनचा धोका कमी होतो.
