स्रिटोएन सी ५ एअरक्रॉस

बापू बैलकर

pegasus apple advisory
iPhone वर ‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरचे संकट, खासगी डेटावर हॅकर्सची संभाव्य ‘नजर’; उपाय काय?
Vodafone Idea Announces fpo, Rs 18000 Crore, Starting from 18 april 2024, each share value 10 to 11 rs, telecom company fpo, vodafone idea telecom, finance news, finance article,
व्होडा-आयडियाची समभाग विक्रीतून १८,००० कोटी उभारण्याची घोषणा, १८ एप्रिलपासून प्रति समभाग १०-११ रुपयांनी विक्री
first Indian woman who joined Unicorn Club
‘अब्ज डॉलर’ कंपनी चालवणारी ‘ही’ भारतीय महिला Unicorn Club मध्ये झाली सामील! कोण आहे जाणून घ्या
Tata Altroz Racer to launch in coming weeks
मारुती, महिंद्रा, ह्युंदाईची उडाली झोप, टाटा ‘या’ हॅचबॅक कारला देशात आणतेय स्पोर्टी अवतारात; कधी होणार विक्री?

आरामदायी वाहने बनविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या स्रिटोएन या फ्रेंच कंपनीने नुकतेच ‘सी ५ एअरक्रॉस’ या कारसह भारतात पदार्पण केले आहे. ऑक्टोबरमध्ये या कंपनीने आपल्या ६५ कारची विक्री करीत १४ व्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. कंपनी आपली दुसरी ‘सी ३’ कारची घोषणाही केली आहे. कंपनीने भारतीय ग्राहकांचा मानसिकतेचा व प्रवासातील आरामाच्या संकल्पनांचा अभ्यास करीत या कारची निर्मिती केली असून ही कार तणावमुक्त व आनंददायी प्रवासाचा अनुभव देईल असा दावाही कंपनीने केला आहे.

‘सी ५ एअरक्रॉस’ कार शाइन व फील या दोन प्रकारांत बाजारात उपलब्ध आहे. ‘शाइन’ या कारची आम्ही नुकतीच टेस्ट ड्राइव्ह घेतली. आपल्याकडील सर्व प्रकारच्या रस्त्यांवरचा अनुभव घेत साधारण ९०० किलोमीटरचा प्रवास केला. तणावमुक्त व आनंददायी प्रवासाचा अनुभव तर मिळालाच शिवाय कोणत्याही परिस्थितीत असुरक्षित असल्याचा अनुभव आला नाही. प्रचंड पिकअप कारमध्ये तर आहेच, शिवाय ती चालकासह सहप्रवाशांमध्येही ऊर्जा वाढविण्यास मदत करते, याबाबत दुमत नाही. इंधनदृष्टय़ाही कार परवडणारी आहे, असे म्हणावे लागेल. ही कारमध्ये डिझेल इंजिन असून ती १२ ते अगदी १६ पर्यंतचे मायलेज देते. या कारची किंमत ३० ते ३२ लाखांदरम्यान आहे.

रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी ‘फ्लाइंग कार्पेट इफेक्ट’ ही प्रगत हायड्रॉलिक कुशन असलेली सस्पेन्शन यंत्रणा खास ‘स्रिटॉन’तर्फे विकसित करण्यात आली आहे. ‘फ्लाइंग कार्पेट’चा अनुभव ही अतिशयोक्ती ठरू शकते, मात्र ही कार खरोखरच आरामदायी प्रवास देते. अतिशय खडतर रस्त्यांवरही अगदी सहज प्रवास होता. खड्डय़ांची जाणीव होते, मात्र त्रास अजिबात जाणवत नाही. कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावर चालवा सहज व सुरक्षित असल्याचा अनुभव येतो.

 विस्तृत दृष्यमानता, हवेशीर दालन

या कारमध्ये विस्तृत दृष्यमानतेसाठी, प्रकाशमान व हवेशीर दालन, विशेषत: बाहेरील दृश्ये पाहता येण्यासाठी ‘पॅनोरामिक सनरूफ’ (टॉप एंड व्हेरिएंटमध्ये) देण्यात आले आहे. कारच्या आरशांची रचना कुठेही चालकाला अडचणीत आणत नाही. मागून येणाऱ्या वाहनांचा व्यवस्थित आंदाज येतो. कारचं दालन अगदीच प्रशस्त आहे. जागांचा वापर अतिशय सुनियोजित करण्यात आला असून भरपूर मोकळी हवा कारमध्ये खेळती राहू शकते. त्यात भर म्हणून ‘पॅनोरामिक सनरूफ’ देण्यात आले आहे. त्यामुळे चालकासह प्रवाशांना अगदी मोकळ्या वातावरणात प्रवास करण्याचा अनुभव मिळतो, परिणामी तणाव निर्माणच होत नाही.

‘वेगवान’ कार

या कारमध्ये २.० लिटरचे डिझेल इंजिन दिले असून त्याला सपोर्ट म्हणून ८ स्पीड कार्यक्षम स्वयंचलित ट्रान्समिशन दिले आहे. त्यामुळे कार अगदी ४०० न्यूटर्न मीटपर्यंतचा टॉर्क देते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वेग कमी पडतो याची जाणीव होत नाही. ‘पिकअप’ जबरदस्त आहे. ऑटोमॅटिक असूनही कोणत्याही क्षणी ती वेग पकडण्यास सज्ज असते. अगदी १२० च्या वेगाने जात असलेल्या दुसऱ्या वाहनाला मागे टाकण्यासाठीही. त्यामुळे चालकासह प्रवाशांना कुठेही निराशेला सामोरे जावे लागत नाही. घाट रस्त्यांवर कुठेही वेग पकडण्यात अडचण येत नाही.

सुरक्षेला प्राधान्य

सुरक्षेसाठी देण्यात येणाऱ्या अपघातपूर्व व अपघातपश्चात असलेल्या सर्व सुविधा कारमध्ये देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कारमध्ये काही कमी असल्याची जाणीव तर होत नाहीच, शिवाय सुरक्षित असल्याची खात्री असते. त्यामुळे ही कार स्वत:ची ऊर्जा वाढविताना चालकासह प्रवाशांची ऊर्जा वाढवत राहते. कार पहिल्यांदा चालविणाऱ्यालाही आनंददायी प्रवासाचा अनुभव देते. 

  • सुखसोयी मिळाव्यात यासाठी कारमध्ये ‘इन्टय़ुटिव्ह तंत्रज्ञान’ वापरण्यात आले आहे.
  • इंच इन्फोटेन्मेंट टचस्क्रीन, ‘अ‍ॅपल कारप्ले’ आणि ‘अँड्रॉइड ऑटो’ अशा अनेक तांत्रिक सुविधांचा समावेश आहे.

प्रगत यंत्रणा, आरामदायी आसन व्यवस्था

ताणमुक्त प्रवासाचे वातावरण देणारी प्रगत यंत्रणा आणि आरामदायक आसन व्यवस्था ही या कारची वैशिष्टय़े आहेत. होय, अगदी आरामदायी आसन व्यवस्था आहे. सर्व आसने आपल्याला हवी त्या पद्धतीने हवी तशी पुढे-मागे, वर-खाली करता येतात, तीही अगदी एका बटनावर. आसनांचा दर्जाही अगदी उच्च आहे. मागील आसनांवर तीन प्रवासी आगदी सहज व कितीही लांबच्या प्रवासात आरामात प्रवास करू शकतात. वेळ पडल्यास एक लहान मुलंही बसू शकते. आर्म रेस्ट नाही. मात्र मधले आसन वाकवून त्याचा वापर हाताला आरामासाठी करता येतो. तसेच आसनांची पाठीकडील बाजू मागे झुकवून संपूर्ण सपाट पातळीवर आणता येतात, त्यामुळे  ‘बूट-स्पेस’ वाढू शकते. ही कार मागील प्रवाशांच्या खास आरामासाठी बनविल्याची जाणीव होते.

बाजारात नवीन काय?     

‘ऑडी क्यू ५’

करोनाकाळातही जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनी ऑडीने भारतीय बाजारात नवनवीन पर्याय उपलब्ध करून देण्याचा पायंडा कायम ठेवला आहे. २०२१ या वर्षांत कंपनीने नऊ कार बाजारात उतरवल्या आहेत. मंगळवारी त्यांनी ‘ऑडी क्यू ५’ ही कार भारतीय बाजारात आणली. अतिरिक्त सुधारणांच्या माध्यमातून ऑडी क्यू ५ मध्ये लक्झरी, स्पोर्टिनेस, आराम आणि दैनंदिन वापरासाठी योग्यता यांचा अचूक संयोग साधण्यात आला असून ही कार भारतीय बाजारात चांगली कामगिरी करेल, असा विश्वास ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीरसिंग धिल्लन यांनी व्यक्त केला आहे.

प्रीमियम प्लस आणि टेक्नोलॉजी या दोन प्रकारांमध्ये कार उपलब्ध असून यांची एक्स शोरूम किंमत अनुक्रमे ५८,९३,००० रुपये आणि ६३,७७,००० रुपये इतकी जाहीर करण्यात आली आहे.

२४९ हॉर्सपॉवर ऊर्जा व ३७० न्यूटर्न मीटर टॉर्क निर्माण करणाऱ्या २.० लिटर टीएफएसआय इंजिनची शक्ती देण्यात आली आहे. कार ६.३ सेकंदात शून्यावरून १०० किलोमीटपर्यंत वेग घेते आणि २३७ किलोमीटर प्रति तास एवढा सर्वोच्च वेग ती गाठू शकते.

ड्राइव्ह सिलेक्टच्या माध्यमातून चालक कंफर्ट, डायनॅमिक, इंडिव्हिज्युअल, ऑटो, एफिशिएन्सी आणि ऑफ रोड या सहा मोड्समधून एकाची निवड करू शकतो. फोर-व्हील ड्राइव्ह प्रणालीमुळे आव्हानात्मक भूप्रदेशांमध्ये सुयोग्य पकड मिळवण्यास मदत होते.

कारची अंतर्गत व बाह्य़ रचना आकर्षित करते. ती पाच रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. २५.६५ सेमी मल्टिमीडिया टचस्क्रीन आणि थर्ड जनरेशन मोडय़ुलर इन्फोटेनमेंट प्लॅटफॉर्म एमआयबी ३ गाडीच्या मध्यवर्ती स्थानी आहेत. बीअँडओ प्रीमियम साऊंड प्रणाली देण्यात आली असून यामध्ये १९ स्पीकर्स असून ते ७५५ वॅट्स निष्पत्तीवर थ्रीडी ध्वनीप्रभाव निर्माण करतात, असेही कंपनीचे म्हणणे आहे.