‘तळवलकर्स’शी भागीदारी, युरोपातील प्रख्यात ‘डेव्हिड लॉइड क्लब’ भारतात दाखल; पुण्यातून सुरूवात

सभासदांसाठीचा आशियातील पहिला क्लब पुण्यात सुरू

युरोपातील सर्वात मोठ्या आणि प्रीमियम रॅकेट्स, हेल्थ आणि फिटनेस क्बल क्षेत्रात वेगाने व्यवसाय वाढवणाऱ्या डेव्हिड लॉइड लिजर ग्रुपने तळवलकर्स बेटर व्हॅल्यू फिटनेससह भागीदारीत भारतातील पहिला ‘डेव्हिड लॉइड क्लब तळवलकर्स’ क्लब पुण्यात शहरात सुरू केला आहे. हेल्थ आणि लिजर व्यवसायातील १०० हून अधिक वर्षांचा अनुभव गाठीशी असलेली डेव्हिड लॉइड क्लब्ज आणि तळवलकर्स बेटर व्हॅल्यू फिटनेस यांनी एक डेव्हिड लॉइड क्लब्ज तळवलकर्स या नावाने एकत्र येत त्यांचा केवळ सभासदांसाठीचा आशियातील पहिला क्लब पुण्यात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

तळवलकर्सचे भारतीय हेल्थ आणि फिटनेस व्यवसायातील ज्ञान आणि डेव्हिड लॉइड लिजरचा प्रीमियम कुटुंबासाठीच्या क्लबमधील अनुभव यांचा संगम साधत कंपनीने भारतात क्लबचा नवा दर्जा उपलब्ध करून देऊन, वाढत्या उच्च-मध्यमवर्गीय ग्राहकांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. हा क्लब १.१ एकरात सात मजली इमारतीत विस्तारलेला आहे. हा क्लब आपल्या सदस्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा व व्यवस्थापन देणार असून, लिजर आणि खेळांची त्यांची गरज एकाच छताखाली पूर्ण करणार आहे.

या क्लबचे संशोधनाधारित तयार केलेले आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचे कार्यक्रम सर्व वयोगटांतील व्यक्तींसाठी उपयुक्त आहेत. क्लबमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळांच्या व व्यायामासाठीच्या सुविधा उपलब्ध आहेत, ज्यामध्ये हीटेड आउटडोअर जलतरण तलाव, जाकुझी, रॅकेट्ससह टेनिस, स्क्वॉश, बॅडमिंटन खेळण्याची सुविधा, एक बहुउद्देशीय सभागृह, जिम आणि ३ ग्रुप एक्झरसाइज स्टुडिओ ज्यामध्ये स्पिनिंग, झुम्बा आणि योगाचे वर्ग घेतले जातील. याच्यासोबतच टू किड्स अॅक्टिव्हिटी रूम्स, अ किड्स सॉफ्ट प्ले झोन, बिलियर्ड्स रूम, स्पा, अडल्ट अँड बिझनेस लाउंज्स आणि ३ वेगवेगळे डायनिंग एरिया, पूलसाइड कॅफे, द क्लबरूम आणि रूफ टॉप ग्लोबल बार आणि रेस्टॉरंट या कॉम्प्लिमेंटरी सुविधांचा लाभही सभासद घेऊ शकणार आहेत. या क्लबमध्ये पुण्यातला सर्वांत मोठा म्हणजे ११० फूटांचा बार आहे, ज्यामध्ये २०० लोक बसू शकतात. याशिवाय सर्व रेस्टॉरंट क्लब रूम्स, क्लब कॅफे आणि द लाँग बार अँड किचनमध्ये वैविध्यपूर्ण सुप्रसिद्ध भारतीय शेफ संजीव कपूर यांनी तयार केलेले अन्नपदार्थही मिळणार आहेत.

या सादरीकरणाबाबत बोलताना डेव्हिड लॉइडचे उपाध्‍यक्ष स्‍कॉट लॉइड म्‍हणाले, ”आम्‍हाला भारताचा आघाडीचा हेल्‍थ व वेलनेस ब्रॅण्‍ड तळवलकर्ससोबत सहयोगाने भारतात आमचे पहिले क्‍लब सादर करण्‍याचा आनंद होत आहे. पुणे हे भारतात आरामदायी, कौटुंबिक व क्रीडा क्‍लब संकल्‍पना आणण्‍यासाठी अगदी योग्‍य शहर आहे. या क्‍लबच्‍या माध्‍यमातून आम्‍ही कुटुंबासोबत चांगला व्‍यतित करण्‍यासोबत अॅथलेटिक व लिजर कृतींमध्‍ये समाविष्‍ट होऊ इच्छिणा-या पुणेकरांसाठी ‘क्‍लबीनेस’ ही आंतरराष्‍ट्रीय संकल्‍पना निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न करतो. आम्‍ही आमच्‍या भागधारकांसोबत दीर्घकालीन सहयोगासाठी उत्‍सुक आहोत. आम्‍ही अविश्‍वसनीय क्‍लब अुनभवाच्‍या माध्‍यमातून आमच्‍या ग्राहकांना सर्वोत्‍तम सुविधा देण्‍याचे वचन देतो. आम्‍ही महसूलाच्‍या माध्‍यमातून आमच्‍या ब्रॅण्‍डला युरोपमधील सर्वात मोठा हेल्‍थ अॅण्‍ड लिजर ग्रुप बनवण्‍यामध्‍ये प्रगती केली आहे आणि पुण्‍यामधील हा उपक्रम संपन्‍न भारतीय अर्थव्‍यवस्‍था इकोप्रणालीमधील आमच्‍या आंतरराष्‍ट्रीय प्रवेशाच्‍या दिशेने वाटचाल आहे.”

”डेव्हिड लॉइड लिजर क्‍लब्‍स हा हेल्‍थ व लिजर क्‍लब्‍स विकसित आणि संचालित करणारा सर्वात मोठा व सर्वोत्‍तम ब्रॅण्‍ड आहे. भारतातील आमचा उपक्रम वेलनेस व लिजर क्‍लब विभागामध्‍ये गेम चेंजर ठरण्‍याची अपेक्षा आहे. या सहयोगासह आम्‍ही कुटुंबावर लक्ष केंद्रित करण्‍यासह त्‍यांच्‍यासोबत एकत्र व व्‍यक्तिगत पातळीवर उत्‍तम क्‍लब अनुभव निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न करतो. डेव्हिड लॉइड क्‍लब्‍स तळवलकर्सचे सादरीकरण हा आमच्‍यासाठी भारतात हेल्‍थ व लिजर क्‍लब बाजारपेठ वाढवण्‍यासोबत आंतरराष्‍ट्रीय व प्रीमिअम पायाभूत सुविधा आणि उत्‍तम ग्राहक अनुभवासह दर्जा उंचावण्‍याकरिता महत्‍त्‍वाचा टप्‍पा आहे. हा नवीन उपक्रम ‘बेटर व्‍हॅल्‍यू फॉर फिटनेस’ या आमच्‍या तत्‍त्‍वाला पुढील स्‍तरावर घेऊन जाण्‍यासाठी धोरणात्‍मक पाऊल आहे.” असं याप्रसंगी बोलताना तळवलकर्स बेटर व्‍हॅल्‍यू फिटनेसचे संचालक प्रशांत तळवलकर म्‍हणाले.

डेव्हिड लॉइड क्‍लबबाबत –
डेव्हिड लॉइड लिजर हा प्रीमिअम रॅकेट्स, हेल्‍थ व फिटनेस क्‍लब्‍सचा युरोपातील सर्वात मोठा व झपाट्याने विकसित होणारा समूह आहे. या समूहाचे युकेमध्‍ये ९९ क्‍लब्‍स असण्‍यासह युरोपामध्‍ये १५ क्‍लब्‍स आहेत. डेव्हिड लॉइड लिजरचे अंदाजे ६१०,००० सदस्‍य आणि ८,६०० कर्मचारी आहेत. तसेच २००० हून अधिक तज्‍ज्ञ आरोग्‍य व फिटनेस टीम आणि ६८० हून अधिक टेनिस प्रोफेशनल्‍स आहेत.

सर्व क्‍लब्‍समध्‍ये १८० हून अधिक स्विमिंग पूल्‍स आहेत आणि दर आठवड्याला १३,००० हून अधिक एक्‍सरसाईज क्‍लासेस घेतले जातात. १००० टेनिस कोर्टस् आणि ४०० हून अधिक बॅडमिंटन व स्‍क्‍वॅश कोर्टससह उत्‍तम रॅकेट्स सुविधा आहेत. डेव्हिड लॉइड क्‍लब्‍स मुलांना उत्‍तम प्रशिक्षण देतात आणि दर आठवड्याला २५,००० मुलांना स्विमिंग शिकतात आणि १६,००० मुले क्‍लब्‍समध्‍ये टेनिस खेळायला शिकतात. ते अद्वितीय फिटनेस सुविधा देतात. येथे हेल्‍थ व ब्‍युटी स्‍पा, लाऊंजेससह मोफत वाय-फाय, क्रेचेस्, नर्सरीज आणि स्‍पेशालिस्‍ट स्‍पोर्टस् शॉप्‍स देखील आहेत.

तळवलर्स बेटर व्‍हॅल्‍यू फिटनेस लिमिटेड बाबत –
१९३२ मध्‍ये विष्‍णूपंत तळवलकर यांनी मुंबई शहरामध्‍ये तळवलकर्स बेटर व्‍हॅल्‍यू फिटनेस लिमिटेड किंवा तळवलकर्स व्‍यायामशाळा सुरू केली. तेव्‍हापासून तळवलकर्स भारताची सर्वात मोठी आरोग्‍य केंद्रांची शृंखला बनली आहे. तळवलकर्सच्‍या देशभरात ८० शहरांमध्‍ये १५० हून अधिक अल्‍ट्रामॉडर्न व्‍यायामशाळा आणि विद्यमान २००,००० ग्राहकांसह वाढता ग्राहकवर्ग आहे. तळवलकर्स केंद्रे आरोग्‍यदायी सोल्‍यूशन्‍सच्‍या रेंजसह व्‍यायामशाळा, वैयक्तिक प्रशिक्षण, पोषणासंदर्भात समुपदेशन, स्‍पा, योगा, झुंबा, ऐरोबिक्‍स, न्‍यूफॉर्म आणि रेड्यूसची सुविधा देतात.
तळवलकर्सने इतर फिटनेस व जीवनशैली ब्रॅण्‍ड्ससह झोर्बा, झुंबा, पॉवरवर्ल्‍ड आणि मिकी मेहता यांच्‍यामध्‍ये देखील गुंतवणूक केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Europes david lloyd clubs comes to india in pune with collaboration with talwalkars sas

Next Story
स्वच्छ पाणी आणि साबणाने मुलांच्या चालनेत वाढ
ताज्या बातम्या