Pitta dosha symptoms : छोट्य छोट्या गोष्टींवरून तुम्हाला लगेच राग येतो का? अनेकदा आपल्या रागाचे कारण केवळ स्वभाव किंवा मानसिक स्थिती समजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते पण आयुर्वेदानुसार शरीराच्या आतमध्ये एखाद्या मोठ्या समस्येचे ते लक्षण असू शकते.
आयुर्वेदिक तज्ज्ञ आणि योग गुरू बाबा रामदेव यांच्या मतानुसार, “शरीरामध्ये पित्त दोषाचे असंतुलनामुळे तुमचा स्वभाव आक्रमक होतो आमि तुमची पचनक्रिया आणि त्वचेचे देखील नुकसान होते.”
पित्त वाढणे एक अशी समस्या आहे ज्याचे अनेक कारणे असू शकतात जे समजून घेणे अत्यंत आवश्यक असते. पित्त वाढल्यामुळे प्रंचड राग येऊ शकतो. राग इतका जास्त येतो की, रागाने डोळे लाल होतात आणि शरीर थरथर कापते. या आयुर्वेदिक तज्ज्ञांकडून समजून घ्या की, पित्त दोष का वाढतो आणि काही घरगुती सोपे उपाय जे तुमचा राग नियंत्रित करतील आणि पित्ताचा त्रास कमी करतील.
पित्त वाढण्याचे कारण (Reason’s of Pita Dosha)
तज्ज्ञांच्या मते, पित्त वाढण्याचे कित्येक कारण असू शकते जसे की,
- जास्त तळलेले आणि मसालेदार अन्नाचे सेवन करणे,
- अनियमित आहार घेणे
- जंकफूड आणि प्रोसेस्ड फूडचे अधिक सेवन
- शरीरात उष्ण गुणधर्म असलेले खाद्य पदार्थांचे जास्त सेवन करणे
- तणाव आणि झोपेची कमतरतेमुळे पित्त दोष वाढू लागतो.
पित्त वाढल्याने शरीरात निर्माण होणारी समस्या (Problems caused by increased bile in the body)
आयुर्वेदानुसार, पित्त दोष वाढण्यामुळे पोटात आग पडणे, गॅस, अॅसिडीटी, आंबट ढेकर, अपचन, छातीत जळजळणे, तोंड कडवट होणे किंवा कडू होणे, जास्त घाम येणे आणि शरीरावरील चरबी वाढणे, चिडचिडपणा वाढणे आणि राग येण्याचे प्रमाण वाढणे, डोके दुखी आणि मायग्रेनची समस्या, त्वचेवर रॅशेज किंवा जळजळ होणे, अल्सर आणि पाईल्सची समस्या निर्माण होऊ शकते.
पित्त दोषाचा त्रासा कसा कमी करावा (How to reduce the problem of gallstones)
भोपळ्याचा रस प्या (Drink Bottle Gourd Juice)
आयुर्वेदिक तज्ज्ञांनुसार भोपळ्याचा रसाचा नैसर्गिक गुर्णधर्म हा थंड आणि आम्लधर्मी किंवा ‘क्षारीय’ असते जे शरीराला वाढलेले पित्त शांत करण्यास मदत करते. पित्त दोष वाढल्यान शरीरात उष्णता, अॅसिडिटी आणि जळजळ सारख्या समस्या वाढू शकतात.अशा परिस्थितीमध्ये भोपळ्याचा रस पिऊ पचनक्रिया दुरुस्त करता येते. पित्त दोष नियंत्रित केला जाऊ शको आणि वजन देखील नियंत्रित केले जाऊ शकते. भोपळ्याचा थंड गुणधर्म शरीरातील जास्तीची उष्णता कमी करते ज्यामुळे पित्त संतुलित होते.
कोहळ्याचा रस प्या (Drink Ash Gourd juice)
जर शरीरात पित्त वाढले असेल तर पचनासंबधीत समस्या वाढू शकतात. प्रत्येक गोष्टीवर राग येत असेल तर तुम्ही कोहळ्याचा रस प्या. कोहळ्याच गुणधर्म थंड असल्याने तो पित्त शांत करतो. जेव्हा शरीरात पित्त वाढते तेव्हा उष्णता, अॅसिडीटी, जळजळ आणि चिडचिडेपणा वाढतो अशा परिस्थितीमध्ये रस तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. कोहळ्याचा रस थंड असतो जो शरीराला अतिरिक्त चरबी देऊन पित्त दोष संतुलित करतो. कोहळा हा थंड गुणधर्माचा असल्याने शरीरातील अधिक उष्णता कमी करतो आणि पित्त संतुलित करतो. पेठा अल्कधर्मी गुणधर्माचा असल्याने शरीरात पीएच पातळी संतुलित करून अॅसिडीटी कमी करण्यात मदत करतो. हे शरीरात टॉक्सिन्स बाहेर काढतात आणि सहायक्क ठरतात ज्यामुळे पित्तासंबधीत समस्या कमी होतात.
गवती चहा (Lemon Grass)
गवती चहाचे सेवन केल्याने पित्त दोष संतुलित होतो. आयुर्वेदानुसार सौम्य, शीतल, सुगंधी आणि पचन सुधारणारी आयुर्वेदीक औषधी वनस्पती मानली जाते. पित्त वाढल्याने शरीरात गर्मी आणि अॅसिटिडी आणि चिडचिडपणा वाढतो अशा स्थितीमध्ये गवती चहा संतूलन साधण्यासाठी मदत करतो. गवती चहा थंड आणि सुखदायक गुण असतात जे पित्तासंबधीत उष्णता कमी करण्यास मदत करतात.
कोरफडीचा रस (Aloe vera juice)
आयुर्वेदानुसार कोरफडीचा रसाचा गुणधर्म थंड आणि पित्त शांत करणारा आहे असे मानले जाते. जेव्हा शरीरात पित्त वाढते तेव्हा शरीरात अॅसिडिटी, जळजळ, त्वचेच्या समस्या आणि राग वाढतो. अशा परिस्थितीमध्ये रस खूप फायदेशीर ठरतो. कोरफड थंड गुणधर्म शरीरातील अंतर्गत उष्णता शांत करतो ज्यामुळे पित्त दोष संतुलित होतो. याचे सेवन केल्याने छातीत जळजळ होते, आंबट ढेकर येण्यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते. गर्भवती महिलांना किंवा दिर्घकाळापासून त्रास देणाऱ्या आरोग्य समस्यां असलेल्या लोकांनी डॉक्टरांच्या सल्लाने कोरफडीचा रस प्यावा.
टीप- वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.
