तणावाचा केवळ मनावरच नाही तर शरीरावरही परिणाम होऊ शकतो. यामुळे अनेक गंभीर शारीरिक आजार होण्याची शक्यता असते, दैनंदिन जीवन जगणे कठीण करू शकतात. नोकरदारांना कामाचा ताण, विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण असतो. याची लक्षणे वेळीच ओळखल्यास आपण त्यापासून स्वतःचा बचाव करून आपले आरोग्य जपू शकतो. यासाठी ताणाची लक्षणे आपल्याला माहिती असणे गरजेची आहेत. आज आपण, ताण आल्याची लक्षणे जाणून घेऊन, त्यावर उपाय करण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करणे उपयुक्त ठरेल हे जाणून घेऊया.

तणावाची लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत –

⦁ डोके दुखणे, शरीर थरथरणे.
⦁ कुठल्याही कामात मन न लागणे आणि निराश राहणे.
⦁ कमी झोपणे किंवा अती झोपणे.
⦁ कमी जेवणे किंवा अती जेवणे.
⦁ कोणत्याही गोष्टीवर लक्ष न देणे.
⦁ इतरांपेक्षा स्वत:ला कमी समजणे.
⦁ नकारात्मक विचार येणे.
⦁ स्वत:ला बिनकामाचा समजणे.
⦁ मृत्यू किंवा आत्महत्येचा विचार येणे.
⦁ राग येणे आणि कमी बोलणे.

bottle gourd halwa for diabetics and heart patients
मधुमेही अन् हृदयरोग्यांसाठी ‘दुधी हलवा’ ठरतो फायदेशीर? डॉक्टर्स नेमके काय सांगतात जाणून घ्या…
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
puberty starting earlier and why it matters health experts Said About signs caution and care You Must Know About
कमी वयात पौगंडावस्थेत येण्याची लक्षणे कोणती? त्यावर काही उपचार आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला…
What can you do to reduce back pain
स्त्री आरोग्य : कंबरदुखीने त्रस्त आहात?

वरील सर्व ही तणावाची लक्षणे आहेत. ही लक्षणे वेळीच ओळखल्यास त्यावर त्वरित उपाय करता येऊ शकतो आणि तणावापासून मुक्ती मिळू शकते. तणाव वाढल्यास विविध आजार होऊ शकतात. जे लोक दीर्घकाळ तणावात असतात त्यांना त्वचा रोग, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल डिसऑर्डर, वजनात बदल, केस गळती, डोकेदुखी, हृदयाचे आजार आणि चिंता वाढण्याचा धोका असतो. म्हणून या आजारांपासून लांब राहायचे असल्यास त्वरीत उपचार करणे गरजेचे आहे.

Blood Sugar Control: रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने डोळ्यांचे ४ आजार होऊ शकतात; जाणून घ्या यांना कसे टाळावे

तणाव दूर करण्यासाठी कोणते पदार्थ खावेत?

⦁ तणाव दूर करण्यासाठी आहारात व्हिटॅमिन सी या जीवनसत्वाचा समावेश असलेल्या फळांचा समावेश करणे फार गरजेचे आहे. आंबट फळांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. अशा फळांचे सेवन केल्यास तणावापासून मुक्ती मिळण्यास मदत होऊ शकते. तणाव दूर करण्यासाठी आहारात द्राक्ष, स्ट्रॉबेरी, संत्रे, लिंबू, केळी, पेरू या फळांचा समावेश तुम्ही करू शकता.
⦁ फ्लेक्ससीड, भोपळ्याच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बियाण्यांमध्ये मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते जे नैराश्य, थकवा आणि चिडचिड कमी करण्यास मदत करते.
⦁ तणाव दूर करण्यासाठी शरीराला क्रियाशील ठेवा. योगा आणि व्यायाम तणाव दूर करण्यात फायदेशीर ठरतात, त्यामुळे याचा आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये समावेश कर.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)