Independence Day 2022: स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देश स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत आहे. यानिमित्ताने देशातील सर्व स्मारकांमध्ये १५ ऑगस्टपर्यंत मोफत प्रवेशाची व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यटक लाल किल्ला, कुतुबमिनार, जालियनवाला बाग, ताजमहाल, फतेहपूर सिक्री, आग्रा किल्ला तुम्ही विनामूल्य पाहू शकतात. स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत बाहेर फिरण्याचा प्लॅन करत असाल, तर भारतीय इतिहासाची ओळख करून घेण्यासाठी या काही खास ठिकाणांना नक्की भेट द्या. जाणून घ्या या ठिकानांबद्दल सविस्तर माहिती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जालियनवाला बागला भेट द्या

जालियनवाला बाग पंजाबमधील स्थित अमृतसर येथील सुवर्ण मंदिराजवळ आहे. जर तुम्ही अमृतसरला गेलात तर सुवर्ण मंदिराला नक्की भेट द्या. श्री हरिमंदिर साहिब येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. तुम्हीही बाबांच्या दराला वंदन करून बाबांचे आशीर्वाद मिळवू शकता. यानंतर, तुम्ही जालियनवाला बागचा ऐतिहासिक दौरा करू शकता. जालियनवाला बाग हत्याकांडाचे वर्णन इतिहासाच्या पानात तपशीलवार आहे.

(हे ही वाचा: Krishna Janmashtami 2022: कृष्ण जन्माष्टमी कधी आहे? पूजेचा विधी, तिथी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या)

इतिहासकारांच्या मते, १३ एप्रिल १९१९ रोजी जनरल डायरने रौलेट कायद्याच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या निशस्त्र लोकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात अंदाजे ४०० लोकांचा मृत्यू झाला होता. त्याच वेळी, २ हजारांहून अधिक लोक जखमी झाले. मात्र, ही अधिकृत आकडेवारी आहे. शहीदांची संख्या त्याहून अधिक होती. भारतीय इतिहासातील हे सर्वात मोठे हत्याकांड होते. सध्या जालियनवाला बागेत एक स्मारक आहे. ब्रिटनच्या इतिहासातील ही सर्वात लज्जास्पद घटना असल्याचे ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी जालियनवाला बाग भेटीदरम्यान सांगितले.

प्लासीला भेट द्या

इंग्रजांच्या उदयाची सुरुवात प्लासीच्या लढाईने झाली. २३ जून १७५७ रोजी ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी आणि बंगालचा नवाब सिराज-उद-दौला यांच्यात या ठिकाणी प्रथमच लढाई झाली. प्लासी पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यात भागीरथी नदीच्या काठावर वसलेले आहे. हे युद्ध भयंकर होते. या युद्धात दोन्ही बाजूंनी आठ हजार सैनिक सहभागी झाले होते. यामध्ये सुमारे १००० जवान शहीद झाले. बंगालचा नवाब सिराज-उद-दौला याला सर्वाधिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे प्लासीच्या लढाईत सिराज-उद-दौलाचा पराभव झाला. इतिहासाची ओळख करून घेण्यासाठी तुम्ही प्लासीला भेट देऊ शकता. याशिवाय पानिपत, कलिंग, मेरठ या पहिल्या भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे ठिकाण यासह देशातील अनेक प्रमुख ठिकाणांना भेट देता येईल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explore these places on independence day to get familiar with indian history gps
First published on: 08-08-2022 at 11:10 IST