महिला, तरुणींना माहितीच आहे. आयलाइनरशिवाय मेकअप अर्धवट आहे. आयलाइनरमुळे संपूर्ण लूक चेंज होतो. आयलाइनर लूकमध्ये आकर्षण वाढवते. मात्र, आजकाल बाजारात आयलायनरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला सर्वोत्तम आयलायनर कोणते याबद्दल सांगणार आहोत. आज आपण लिक्विड, पेन्सिल, जेल अशा अनेक प्रकारच्या आयलायनरबद्दल जाणून घेऊयात. तसेच आयलाइनर कसे लावायचे हेसुद्धा पाहुयात…

आयलायनरचा विचार केला तर अनेक पर्याय आहेत. येथे काही प्रकार आहेत जे तुम्हाला माहित असले पाहिजेत आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या लूकनुसार हे निवडू शकता.

लिक्विड आयलाइनर

लिक्विड आयलाइनर तुमच्या डोळ्यांना अधिक तीक्ष्णता देते. सामान्य पेन्सिल आयलाइनरपेक्षा ते अधिक प्रभावी दिसते. लिक्विड आईलाइनर सहजपणे डोळ्यांच्या पापण्याला लागू शकतो. हे आपल्या डोळ्यांसाठी देखील फायदेशीर आहे. लाइनर लावताना फक्त पातळ ब्रश वापरा आणि डोळ्यांखालील पापण्यांवर लावू नका, अन्यथा ते पसरून तुमच्या डोळ्यांचा संपूर्ण मेकअप खराब होईल. जर तुम्हाला लाइनर दिवसभर टिकून राहायचे असेल तर वॉटरप्रूफ लिक्विड लाइनर खरेदी करा.

जेल आयलाइनर

स्मोकी डोळे मिळविण्यासाठी जेल आयलाइनर सर्वोत्तम आहे. हे आयलायनर लिक्विड आणि पेन्सिल लाइनरपेक्षा वेगळे आहे. एका लहान बॉक्समध्ये काजळ आणि पातळ ब्रश असतो. ब्रशच्या मदतीने आयलायनर लावावे लागते. लिक्विड लाइनरपेक्षा ते लागू करणे सोपे आहे. मॅट फिनिशिंगसाठी जेल आयलाइनर देखील खूप चांगले आहे.

पेन्सिल आयलाइनर

तुम्हाला माहितीच असेल पूर्वी फक्त पेन्सिल आयलायनरचा ट्रेंड होता. डोळ्यांना स्मोकी लूक देण्यासाठी याचा वापर केला जातो. जर तुम्ही आयलायनर लावण्यासाठी नवीन असाल तर पेन्सिल आयलायनरच वापरा. ते पसरण्याची भीती नसते आणि डोळ्यांना आपल्याला हवा तसा आकार देता येतो. फक्त लक्षात ठेवा की तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्स घातल्यास, पेन्सिल आयलाइनर वापरू नका. लाइनर लावताना तुमचा हात खूप थरथरत असेल तर टोकदार पेन्सिलऐवजी गोल टोक असलेली पेन्सिल घ्या. हे लावताना डोळ्यांना पेन्सिल टोचण्याची भीती राहणार नाही. आणि इजाही होणार नाही.

फील्ट-टिप आयलाइनर

फेल्ट-टिप आयलाइनर हे लिक्विड आयलाइनरचा एक प्रकार आहे.परफेक्ट लुक मिळवण्यासाठी हे उत्कृष्ट आहे.हे लाइनर इतर लाइनरपेक्षा थोडे लवकर सुकते. ज्या महिलांना विंग लाइनर लावणे आवडते त्यांच्यासाठी हे सर्वोत्तम आहे. जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही हे लायनर डोळ्यांवर लावू शकता.

हेही वाचा >> केस सारखे रंगवून केसांची झालीये वाईट अवस्था? मग पाहा एक्स्पर्टसने दिलेला सल्ला…

क्रीम आयलाइनर

क्रीम आयलाइनर आपल्याला एकदम नॅचरल लूक देतो. अनेक वेळा महिला आयलायनर लावतात, पण ते त्यांच्या चेहऱ्याला शोभत नाही. कारण आयलायनरचा लूक त्यांच्या डोळ्यांच्या आकारावर बऱ्याच अंशी अवलंबून असतो. त्यामुळे लायनर लावण्यापूर्वी तुमच्या डोळ्यांचा शेप जाणून घ्या आणि मग तुमच्या डोळ्यांच्या आकारानुसार लाइनर लावा