दिवसभर आपले सर्व काम लॅपटॉप आणि मोबाईलवर सुरू असते. त्यामुळे सतत स्क्रीनच्या संपर्कात असल्याने डोळ्यांना थकवा जाणवू शकतो. यामुळे डोळे लाल होणे, डोळयांना खाज येणे, डोळ्यातून सतत पाणी येणे, डोळे सुजणे, अस्पष्ट दिसणे अशा समस्या येऊ शकतात. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आणि डोळ्यांचा थकवा दुर करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय मदत करू शकतात. कोणते आहेत ते उपाय जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोळ्यांचा थकवा दुर करण्यासाठीचे उपाय:

आणखी वाचा: टूथब्रश किती दिवसानंतर बदलावा? टूथब्रश ठेवण्याच्या जागेचाही होतो आरोग्यावर परिणाम? जाणून घ्या

बर्फ
बर्फ एका कापडात गुंडाळून डोळ्यांवर लावा, यामुळे डोळ्यांना येणारी सुज, थकवा यांपासून सुटका मिळण्यास मदत होईल.

दूध
दुधानेदेखील डोळ्यांचा थकवा दुर करण्यास मदत मिळते. थंड दुधात कापसाचा बोळा बुडवून तो डोळ्यांवर लावा. हे लावताना डोळ्यांच्या आजूबाजूलाळा मसाज करण्याचा प्रयत्न करा. यामुळे डोळ्यांना थंडावा मिळेल आणि डोळ्यांचा थकवा दुर होईल.

व्यायाम
डोळ्यांना थकवा आल्याने जास्त त्रास होत असेल तर तुम्ही नियमित डोळ्यांचे व्यायाम करणे गरजेचे आहे. डोळ्यांचे व्यायाम करणे डोळ्यांच्या आरोग्यासह लक्ष केंद्रित करण्यासही मदत करते.

आणखी वाचा: सकाळी चेहरा धुताना कोणते पाणी वापरावे थंड की गरम? जाणून घ्या Skin Care बाबतच्या महत्त्वाच्या गोष्टी

काकडी
काकडीमुळे डोळ्यांना थंडावा मिळतो. यासाठी मध्यम आकाराची काकडी १५ ते २० मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर काकडीचे जाड काप कापून डोळ्यांवर ठेवा. यामुळे डोळ्यांना जाणवणारा थकवा कमी होऊन, डोळ्यांना थंडावा मिळण्यास मदत होईल

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eye care tips continue screen time makes your eyes tired and puffy use these simple home remedies to get rid of it pns
First published on: 08-12-2022 at 10:48 IST