फेसबुकनं आपलं सर्वात जुनं ‘टिकर बॉक्स’ हे फिचर टाकलं काढून

२०११ मध्ये हे फिचर लाँच करण्यात आलं

संग्रहित छायाचित्र

फेसबुकनं आपलं सर्वात जुनं ‘टिकर बॉक्स’ हे फिचर काढून टाकलं आहे. फेसबुकच्या उजव्या बाजूला असणाऱ्या या टिकर बॉक्समध्ये मित्र मैत्रिणींच्या ताज्या घडामोडींबद्दल माहिती उपलब्ध व्हायची. म्हणजे कोणत्या मित्रानं किंवा मैत्रिणीने काय लाईक केलं, कुठे कॉमेंट केली याबद्दलचे अपडेट्स यायचे. वेळेप्रमाणे या अपडेट्स बदलल्या जायच्या.

पण, हा टिकर बॉक्स फेसबुककडून काढून टाकण्यात आला असल्याचं ‘टेक क्रंच’नं म्हटलं आहे. २०११ मध्ये हे फिचर लाँच करण्यात आलं होतं. एखाद्या फिचरचा फारसा उपयोग होत नसेल तर फेसबुककडून ते काढून टाकण्यात येते. यावेळीही फेसबुकनं तेच केलं आहे. या जागी आता ‘ग्रीटिंग्स’ हे नवं फिचर येणार आहे. या नवीन फिचरमुळे युजर्स ‘हग’, ‘हायफाइव्ह’ अशा प्रकारचे ग्रीटींग्स पाठवू शकतात. याशिवाय, ‘पोक’ या फीचरमध्ये हे वेगवेगळे पर्याय उपलब्ध असणार आहेत. ‘ग्रीटिंग्स’ हे फिचर सध्या थायलंड, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कोलंबियामध्ये रोलआउट झालं आहे. ते लवकरच भारतीय फेसबुक युजर्सनाही वापरता येईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Facebook just killed the ticker news feed

ताज्या बातम्या