Fan Speed Increase Tips: उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उष्णतेची लाट आल्यामुळे पारा ४२ ते ४५ अंशांवर गेलाय. इतक्या उकाड्यामध्ये पंख्याची हवादेखील गरमच येऊ लागते. कूलरचा थंडावा पुरेसा ठरत नाही. दिवसा वातावरणातली उष्णता घराला गरम करते. त्यात पंखे सतत चालू असल्यानं रात्री त्यातून गरम हवा येते. उकाड्यामुळे शांत झोपही मिळत नाही. सर्वात आधी लक्ष द्यायची गोष्ट म्हणजे पंख्याची स्वच्छता. पंख्याच्या पातींवर धूळ साचलेली असेल, तर ती हवा योग्य प्रकारे देत नाही. त्यामुळे पंख्याची गती जरी जास्त असली तरी हवा कमी आणि गरम जाणवते. उन्हाळ्यात एसी नसेल तर काही सोप्या घरगुती उपायांनी तुम्ही पंख्याची हवा थंड करू शकता. त्यासाठी काही टिप्स नक्की वापरा.

पंख्याची नियमित साफसफाई करा

आठवड्यातून किमान एकदा पंख्याच्या पाती स्वच्छ करणे गरजेचे आहे. पंखा बंद करून, कोरड्या कापडाने किंवा हलक्या ओल्या कापडाने पाती नीट पुसल्यास हवा लगेचच हलकी आणि ताजी वाटू लागते. पंखे स्वच्छ करण्यासाठी एक मऊ कपडा किंवा कोमट पाण्यात भिजवलेला कापड वापरा. तसेच, पंख्याची ग्रिल किंवा जाळीदेखील स्वच्छ करा. यामुळे हवेचा प्रवाह मोकळा राहतो आणि पंख्याचा वेग वाढतो.

कॅपेसिटर बदला

पंख्याचे कपॅसिटर बदलून पाहा. तुम्ही टेक्निशियनला बोलावून नवीन कपॅसिटर लावू शकता किंवा स्वत:ही बदलू शकता. कोणत्याही दुकानात अगदी 50-60 रूपयांना नवीन आणि पॉवरफुल कपॅसिटर मिळते. ते लावताक्षणी एसीसारखी थंडगार हवा येऊ लागेल. पंखा बदलण्याची गरजच नाही. जुना कपॅसिटर काढताना त्याची जागा लक्षात ठेवा. ज्या पद्धतीने जुना कपॅसिटर काढाल तसाच व त्याच ठिकाणी दुसरा नवीन लावा.

पंख्याचे ब्लेड मेंटेन ठेवा

काहीवेळा पंख्याच्या ब्लेडमधील असंतुलनामुळे त्याचा वेग कमी होतो. हे ब्लेड एकसारखे न फिरल्यामुळे हवा नीट प्रवाहित होत नाही. ब्लेडचे संतुलन तपासण्यासाठी त्यांना योग्य प्रकारे सेट करा किंवा आवश्यकता असल्यास बदल करून घ्या. संतुलित ब्लेडमुळे पंख्याचा वेग वाढतो आणि आवाज कमी होतो.

खिडकीला ओला सूती पडदा

अनेकजण खिडकीला ओला सूती पडदा लावण्याचाही सल्ला देतात. बाहेरून येणारी गरम हवा या ओल्या कापडातून आत येताना काही प्रमाणात थंड होते. ग्रामीण भागात आजही हा उपाय मोठ्या प्रमाणावर वापरला जातो.घरात योग्य वेंटिलेशन असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. सकाळी आणि संध्याकाळी घरातील समोरासमोरच्या खिडक्या उघडल्यास क्रॉस व्हेंटिलेशन तयार होतं. त्यामुळे गरम हवा बाहेर जाते आणि ताजी हवा घरात प्रवेश करते. त्यामुळे घरातला उकाडा कमी जाणवतो. याशिवाय, सीलिंग फॅनची दिशा योग्य असणंही महत्त्वाचं असतं. उन्हाळ्यात पंखा अशा दिशेने फिरायला हवा की हवा खालीच्या बाजूला येईल. त्यामुळे शरीराला अधिक थंडावा मिळतो.