Beauty Tips : मान काळी पडलीय? ‘हा’ घरगुती उपाय करा, नक्की होईल फायदा

दिवसभर साचलेली घाण कधी कधी बघायला खूप वाईट वाटते. त्यामुळे मानेचा भाग काळा दिसू लागतो. मानेवरील घाम नीट साफ न केल्यामुळे तो थराच्या स्वरूपात जमा होतो.

Neck-Tanning

दिवसभर साचलेली घाण कधी कधी बघायला खूप वाईट वाटते. त्यामुळे मानेचा भाग काळा दिसू लागतो. मानेवरील घाम नीट साफ न केल्यामुळे तो थराच्या स्वरूपात जमा होतो. जे दिसायला फार वाईट दिसतं. अशा परिस्थितीत टोमॅटोच्या मदतीने ते साफ करता येतात. टोमॅटोमध्ये असलेले मॅग्नेशियम त्वचेला चमकदार बनवतं. त्वचा अँटीऑक्सिडंट्ससह स्वच्छ होते. चला तर मग जाणून घेऊया टोमॅटोने मान कशी स्वच्छ करावी?

जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर टोमॅटोचा लगदा काढा, मानेवर लावा आणि पाच ते सात मिनिटे सोडा. नंतर कोमट पाण्याने स्वच्छ करा. टोमॅटोचा लगदा एका दिवसाच्या अंतराने लावल्यास काही दिवसात फरक दिसून येईल. टोमॅटोचा लगदा लावल्यानंतर बोटांच्या मदतीने हलका मसाज करा.

आणखी वाचा : Health Tips : तुमच्या अशा सवयींमुळे स्वादुपिंड खराब होतो, गंभीर समस्यांचा धोका वाढतो

टोमॅटो आणि बेकिंग सोडा
मान काळ्या रंगापासून चमकदार बनवायची असेल, तर बेकिंग सोड्यात टोमॅटोचा ताजा रस काढून त्यात थोडे पाणी टाकून घोळून घ्या. एक चमचा बेकिंग सोडामध्ये दोन ते तीन चमचे टोमॅटोचा रस मिसळा. हे मिश्रण आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावा. ही टोमॅटो पेस्ट मानेवर लावा आणि सोडा. दहा मिनिटांनी पाण्याने स्वच्छ धुवा. या पेस्टचा प्रभाव काही दिवसात दिसून येईल.

आणखी वाचा : Health Tips : रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्या, हे फायदे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल

टोमॅटो आणि हळद पॅक
टोमॅटोच्या रसात चिमूटभर हळद टाकल्यानेही मानेचा रंग साफ होतो. यासाठी टोमॅटो आणि हळदीची पेस्ट बोटांच्या मदतीने मसाज करा. नंतर दहा मिनिटे राहू द्या. ते सुकल्यावर पाण्याने स्वच्छ करा. काही दिवस सतत वापरल्यानंतर त्याचा परिणाम मानेवर स्पष्टपणे दिसून येईल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fashion beauty tips remove tanning on neck with tomato the color of the neck will glaze tips prp

Next Story
Health Tips : तुमच्या अशा सवयींमुळे स्वादुपिंड खराब होतो, गंभीर समस्यांचा धोका वाढतो
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी