Footwear For Bride In Marathi : मुलींना त्यांच्या लग्नात स्टायलिश आणि सुंदर दिसायचे असते. जसजशी त्यांच्या लग्नाची तारीख जवळ येते तसतशी ती ट्रेंडी कपड्यांपासून दागिन्यांपर्यंत सर्व गोष्टींची खरेदी करण्याची धावपळ सुरू होते. केवळ लग्नाच्या दिवशीच नव्हे तर पाठवणीनंतर सासरच्या घरातील विधी आणि कार्यक्रमांसाठी नवरीला तयार राहावं लागतं. अशा परिस्थितीत प्रत्येक फंक्शनमध्ये परफेक्ट लूकसाठी मुलींना वरपासून खालपर्यंत लेटेस्ट ट्रेंड फॉलो करावा लागतो. यासाठी आउटफिट, दागिने, स्टायलिश फुटवेअर आवश्यक आहेत. तुम्ही महागडे कपडे घालता पण जर तुमचे फुटवेअर तुमच्या आउटफिटशी जुळणाऱ्या ट्रेंडमध्ये नसतील तर तुमचा लुक फिका पडतो. जर तुम्ही लग्नात लेहेंगा घातला असेल तर कोणत्या प्रकारची चप्पल घालायची, साडी किंवा सूटसोबत फुटवेअर कसे घालावेत ? हे तुम्हाला माहित असले पाहिजे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लग्नाच्या सीजनमधील नवरीसाठीचे काही ट्रेंडी आणि स्टायलिश फुटवेअरबाबत काही टिप्स तुमच्या उपयोगाचे ठरू शकतात…

लेहेंगा किंवा साडीसोबत हील्स कॅरी केल्यानेही स्टायलिश लुक येतो आणि तुमचा पोशाख व्यवस्थित राहतो. हेवी लेहेंग्यासोबत हील्स घालून तुम्ही तुमचा लेहेंगा तुमच्या उंचीनुसार समायोजित करू शकता. अशा मॅचिंग हील्स लेहेंगासोबत घालता येतात.

तुमच्या सँडलच्या डिझाईन आणि स्टाइलवरही लक्ष केंद्रित करा. नवरीच्या पायाचे सौंदर्य वाढेल अशा हील्स घ्या. शिमरी, गोल्डन, सिल्व्हर अशी हील्स वधूच्या पायाला शोभतील. अॅंकल स्ट्रॅप ब्रायडल सॅंडल्स हा एक उत्तम पर्यात तुमच्यासाठी असू शकतो. ज्यामुळे तुमचे मेंदीने रंगलेले पाय नक्कीच सुंदर दिसतील.

आणखी वाचा : Wedding Tips : लग्नाआधी तुमच्या जोडीदाराबद्दल या पाच गोष्टी आवर्जून जाणून घ्या, आयुष्य सुखी होईल

जर तुम्ही खूप उंच टाच किंवा व्हॅली परिधान करत असाल, तर तुम्ही अशा सपोर्टिंग स्टाइल हील्स घालू शकता किंवा सहजतेने कॅरी करण्यासाठी वेजेस घालू शकता. जेणेकरुन जर तुम्हाला जास्त काळ टाचांमध्ये राहावे लागत असेल तर तुमच्या पायांना त्रास होणार नाही. ज्यामध्ये हील्स आणि पायाच्या टाचेत एकसमान सोल लावण्यात आलेलं असतं. मात्र त्यामुळे तुमची उंची अधिक दिसते. जर तुम्हाला तुमची उंची वाढवायची असेल तर लग्नात वेजेस एक चांगला पर्याय ठरू शकेल.

आणखी वाचा : Best Wedding Dresses : लग्न आणि विधी समारंभासाठी बेस्ट वेडिंग आउटफिट्स; सगळ्यांच्या नजरा तुमच्यावरच खिळून रहातील

तसं पहायला गेलं तर, इतर विवाह विधी किंवा लग्नानंतरच्या कार्यक्रमांमध्ये आरामदायक फुटवेअर घ्या. शूज सध्या फॅशनमध्ये ट्रेंड करत आहेत. यात वधूला जोडलेले मजेदार कोट प्रिंट्स असतात. जर तुम्ही एखाद्या विधीला पंजाबी सूट घालणार असाल तर तुम्ही मोजडी नक्कीच घालू शकता. पंजाबी आऊटफीटवर मोजडी छान दिसतात.

तुम्हाला जर जरा हटके प्रकार हवे असतील तर तुम्ही तुमच्या कोल्हापूरला जाऊन तुमच्या फुटवेअरची खरेदी करू शकता. स्टायलिश सँडल सूट किंवा साडीसोबत कॅरी करा. ते केवळ वधूच्या पायाचे सौंदर्यच वाढवत नाहीत, तर स्टाईलच्या दृष्टीने तुम्हाला सर्वोत्तम पर्यायही देतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fashion bridal footwear style wedding shoe trends wedding fashion tips bridal tips bridal stylish footwear prp
First published on: 01-12-2021 at 21:34 IST