नवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात झाली असून, या दिवसात अनेकजण उपवास धरतात. शरीर आणि मनाच्या शुध्दीकरणासाठी तसेच देवीची उर्जा प्राप्त करण्यासाठी काहीजण सर्व नऊ दिवस, तर काही जण जमतील तसे उपवास धरतात. प्रत्येक समाजाचे नवरात्रीसाठीच्या उपवासाचे नियम वेगळे असतात. पौष्टिक आणि हलका आहार हा उपासामागील समान हेतू आहे. प्रामुख्याने साबुदाणा, शिंगाडा पीठ, शेंगदाणे, सेंधे मीठ आणि राजगिरा इत्यादी साहित्यांचा उपवासाचे पदार्थ बनविताना वापर करण्यात येतो. तुम्ही अथवा तुमच्या घरातील अन्य सदस्य उपवास धरणार असाल तर या नऊ दिवसांसाठी उपवासाच्या खास पाककृती.
१. साबुदाणा खिचडी :
साबुदाणा ओला करून ही खिचडी तयार करता येते. काही वेळासाठी साबुदाणा भिजत ठेऊन नंतर जिरे, मीठ, लाल तिखट, हिरवी मिर्ची, शेंगदाणे आणि अन्य जिन्नस घालून नीट परतून घेतल्यानंतर चवदार साबुदाणा खिचडी तयार.
पाहा पाककृतीचा व्हिडिओ (सौजन्य – निशा मधुलिका)
२. कुरकुरीत रवा डोसा:
दक्षिण भारतातील ही लोकप्रिय पाककृती आहे. यामध्ये रव्याचा प्रामुख्याने वापर होतो. तुम्ही साधा रवा डोसा अथवा कडीपत्ता, मसाल्याचे पदार्थ आणि तिखटाचा वापर करून थोडा झणझणीत रवा डोसा करू शकता. रवा डोसा बनवण्यासाठी पीठ आंबवावे लागत नाही हा याचा फायदा असून, बनविण्यासदेखील सोपा आहे.
पाहा पाककृतीचा व्हिडिओ (सौजन्य – निशा मधुलिका)
३. शिंगाड्याच्या पिठाचा हलवा:
उपासाच्या पदार्थांमध्ये शिगाड्याचे पीठ उत्तर भारतात खूप लोकप्रिय आहे. शिंगाड्याच्या पिठापासून बनणारा हलवा ही झटपट आणि सोपी पाककृती आहे. नेहमीच्या हलव्याप्रमाणेच याची कृती असून यासाठी काही प्रमाणात दूध अथवा पाण्याचा वापर केला जातो इचकाच काय तो फरक आहे.
पाहा पाककृतीचा व्हिडिओ (सौजन्य – रेसेपीयुलाईक)
४. व्रताच्या तांदळाची खीर:
व्रताच्या तांदळाची खीर नवरात्रीत बनवलीच जाते. यात दूध, साखर, स्वादासाठी वेलची पावडर, केशर इत्यादी जिन्नस पडतात. नेहमीच्या खिरीसारखीच या खिरीची चव लागते.
पाहा पाककृतीचा व्हिडिओ (सौजन्य – फुडस् अॅण्ड फुडस्)
५. व्रताची कढी:
सणासुदीच्या दिवशी तयार होणारी ही एक महत्त्वाची कढी आहे. पचायला सोपी आणि शरीराला शितल अशी ही कढी आहे. यात बेसन पिठाऐवजी राजगिरा पिठाचा वापर होतो. कुट्टुची खिचडी, राजगिरा पराठा, राजगिरा पुरी आणि कुट्टुचा पराठा इत्यादीबरोबर ही कढी खूप छान लागते.
पाहा पाककृतीचा व्हिडिओ (सौजन्य – संजीव कपूर खजाना)
६. राजगिरा पनीर पराठा:
राजगिरा पराठ्यासाठीची पोळी ही राजगिरा पीठ आणि बटाट्यापासून बनविण्यात येते, ज्यामुळे पराठा मऊसर आणि खरपूस होतो.
पाहा पाककृतीचा व्हिडिओ (सौजन्य – तरला दलाल)