Diabetes Prevention :मधुमेहाच्या व्यवस्थापनात मोठा गोंधळ तेव्हा निर्माण होतो जेव्हा आपल्या चाचणी अहवालातील आकडे ‘सीमेवर’ असतात. जर एखाद्या व्यक्तीने आपल्या रक्तातील साखरेची पातळी तपासली आणि त्याची उपाशीपोटी रक्तातील साखर १११ mg/dL आणि HbA1c ५.५% असेल, तर हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे की साखरेच्या चाचणीचे हे आकडे प्री-डायबिटीजची (मधुमेहाची पूर्वस्थिती) सुरुवात आहेत की सर्व काही सामान्य आहे?

सर्वप्रथम HbA1c ची सामान्य श्रेणी काय आहे हे समजून घेऊया.

मधुमेह तज्ञांच्या मते, HbA1c ५.७% पेक्षा कमी असणे हे पूर्णपणे सामान्य आहे. परंतु जेव्हा साखरेची पातळी ५.७% ते ६.४% पर्यंत पोहोचते, तेव्हा तो प्री-डायबिटीज स्थिती असते, म्हणजेच साखर वाढण्याची सुरुवात असते, ज्यासाठी तुम्हाला सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जर साखरेची पातळी ६.५% किंवा त्याहून अधिक असेल, तर ते मधुमेहाचे लक्षण आहे.

वॉकहार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रल येथील सल्लागार एंडोक्राइनोलॉजिस्ट आणि डायबेटोलॉजिस्ट डॉ. प्रणव घोडी यांनी सांगतात की, आदर्शपणे उपाशीपोटी रक्तातील साखर (फास्टिंग ब्लड शुगर) १०० mg/dL पेक्षा कमी असली पाहिजे.

Award Banner

Quora वर एका व्यक्तीने विचारले की, माझी उपाशीपोटी रक्तातील साखर १११ आहे आणि HbA1c ५.५ आहे, हे सामान्य आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना डॉ. प्रणव घोडी यांनी सागिंतले की की, १११ mg/dL उपाशीपोटी रक्तातील साखर ही सामान्य मर्यादेपेक्षा किंचित जास्त आहे आणि याला सामान्यतः ‘इम्पेअर्ड फास्टिंग ग्लुकोज’ (impaired fasting glucose) किंवा ‘प्रीडायबिटीज’ (prediabetes) असे म्हटले जाते. पण, ५.५ टक्के HbA1c पातळी पूर्णपणे सामान्य आहे. कारण रक्तातील साखरेची सामान्य पातळी ५.७ टक्क्यांपेक्षा कमी असते. याचा अर्थ असा की, गेल्या २ ते ३ महिन्यांपासून तुमच्या रक्तातील साखरेची सरासरी पातळी नियंत्रणात आहे.

Quora वरील या व्यक्तीने असे की, डॉक्टरांनी ही परिस्थिती थोडी चिंताजनक असू शकते, परंतु ती असामान्य नाही. तणाव, झोपेचा अभाव, रात्री उशिरा खाणे किंवा सौम्य आजार यांसारख्या अनेक घटकांमुळे उपवासानंतरच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो. HbA1c अहवाल तुमची साखर नियंत्रणात आहे की, नाही याचे एक सर्वसमावेशक चित्र दर्शवते.

तज्ज्ञांच्या मते,”काळजी करण्याऐवजी, या स्थितीकडे एक प्रारंभिक संकेत आणि सुधारणेची संधी म्हणून पाहिले पाहिजे. याचा अर्थ असा की तुम्हाला मधुमेह नाही, परंतु तुमच्या शरीरात सौम्य इन्सुलिन प्रतिरोध विकसित होऊ शकतो.

या परिस्थितीत तुम्ही काय करावे?

डॉक्टरांनी सांगितले की, अशा परिस्थितीत तुम्ही औषधांवर लक्ष केंद्रित न करता तुमची जीवनशैली बदलावी. दररोज ३० ते ४५ मिनिटे वेगाने चालणे किंवा इतर व्यायाम यांसारखा नियमित शारीरिक व्यायाम करा. शारीरिक व्यायामामुळे इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते. या परिस्थितीत तुमचा आहार देखील खूप महत्त्वाचा आहे. आहारात प्रक्रिया केलेल्या कर्बोदकांचे (refined carbohydrates) सेवन कमी करा, अन्नाचे प्रमाण नियंत्रित करा. तुमच्या आहारात भाज्या, संपूर्ण धान्य आणि कडधान्ये यांचा समावेश करा. आहारात फायबरचे प्रमाण वाढवा. फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी सामान्य ठेवण्यास मदत होते. तसेच तुमचे वजन नियंत्रणात ठेवा. उच्च रक्तातील साखरेमुळे वजन वाढते. तुमच्या झोपेची काळजी घ्या. चांगली झोप घेणे आणि तणावावर नियंत्रण ठेवणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे, ज्याकडे लोक अनेकदा दुर्लक्ष करतात.

डॉ. घोडी सल्ला देतात की,” तुम्ही काही आठवड्यांसाठी तुमचा आहार आणि जीवनशैली बदला आणि त्यानंतर उपाशीपोटी तुमच्या रक्तातील साखरेची पातळी तपासा. चांगली झोप घेऊन उपाशीपोटी साखरेची पातळी तपासण्याचे लक्षात ठेवा. एवढे सर्व प्रयत्न करूनही रक्तातील साखर जास्त असल्यास, ताबडतोब तुमच्या डॉक्टरांना भेटा. गरज भासल्यास जेवणानंतरच्या साखरेची चाचणी (पोस्ट-मील शुगर टेस्ट) किंवा ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट देखील केली जाऊ शकते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सध्या कोणतीही चिंता नसली तरी, सतर्क राहण्याची हीच योग्य वेळ आहे. आता केलेले छोटे जीवनशैलीतील बदल भविष्यात मधुमेह टाळण्यास मदत करू शकतात.”