Fathers Day 2023: वडील हे घरातील महत्त्वाचे सदस्य असतात, संपुर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असते. आपल्या कुटुंबाची देखभाल करण्यासाठी आणि कुटुंबातील सदस्यांना आनंदी ठेवण्यासाठी ते रात्रंदिवस कष्ट करतात. वडील सर्वांवर प्रेम करतात, पण आपल्या मनातील भावना शक्यतो कोणाशी शेअर करत नाहीत. शिवाय त्यांना आपल्या मुलांनी आपल्याला काही द्यावं याची अपेक्षादेखील नसते. मात्र आपल्या वडिलांसाठी काहीतरी गिफ्ट देणं मुलांचं कर्तव्य असतं. त्यामुळे वडिलांप्रती आपल्या मनात असणारं प्रेम व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 'फादर्स डे' साजरा केला जातो. यंदाचा फादर्स डे हा १८ जून रोजी साजरा केला जाणार आहे. त्यामुळे वडिलांना नेमकं काय गिफ्ट द्यावं? हा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. यासाठीच आज आम्ही तुम्हाला वडिलांना काय गिफ्ट्स द्यायचे याबाबतच्या काही आयडीया सांगणार आहोत. 'या' गिफ्ट तुम्ही वडिलांना देऊ शकता - पर्सनलाइझ फोटो बुक किंवा फोटो कोलाज - वडिलांना एखाद्या फोटोची फ्रेम किंवा लहानपणापासून तुमच्या वडिलांबरोबरच्या आठवणीचा एक कोलाज तयार करा. घड्याळ - तुमच्या वडिलांचे नाव कोरलेलं एखादे स्टाइलिश घड्याळ त्यांना भेट म्हणून देऊ शकता. जेवण - या दिवशी तुमच्या वडिलांच्या आवडीचे पदार्थ त्यांना खायला द्या. सरप्राईज देण्यासाठी वडिलांना आवडणाऱ्या सर्व गोष्टींनी भरलेली गिफ्ट बास्केट तयार ठेवा. तसेच जमल्यास त्यांना हॉटेलमध्ये घेऊन जा. फिटनेस ट्रॅकर - वडिलांना त्यांच्या दैनंदिन हालचाली आणि वर्कआउट्सचे निरीक्षण करण्यासाठी फिटनेस ट्रॅकर किंवा फिटनेस बँड भेट म्हणून द्या. पुस्तक किंवा ई-रीडर - जर तुमच्या वडिलांना वाचनाची आवड असेल तर त्यांच्या आवडत्या लेखकाची ई-रीडरचे पुस्तके किंवा आवडत्या कादंबऱ्यांचा भेट द्या. मोबाईल - अनेक पालकांना महागडे मोबाईल वापरत नाहीत. मात्र, तुम्ही तुमच्या पैशांनी मोबाईल घेऊन दिला तर त्यांना खूप आनंद होईल. पिकनिक प्लॅन - रोजच्या धावपळीच्या जीवनातील थोडा वेळ काढून फादर्स डेच्या निमित्ताने वडिलांना बाहेर फिरायला घेऊन जा.