Fathers Day History, Significance 2025 : दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी ‘फादर्स डे’ साजरा केला जातो. यावर्षी हा दिवस १५ जून रोजी साजरा केला जाईल. हा दिवस विशेषत: पितृत्वाची भूमिका बजावणाऱ्या वडील आणि जगभरातील सर्व पुरुषांना समर्पित आहे. ज्याप्रमाणे ‘मदर्स डे’ला आपण आईच्या कार्याचा सन्मान करतो, त्याचप्रमाणे ‘फादर्स डे’निमित्त वडिलांचे त्याग, प्रेम आणि मार्गदर्शनाबद्दल आभार मानले जातात.
या दिवशी वडिलांना खास वाटावे यासाठी प्रयत्न केले जातात, त्यामुळे ‘फादर्स डे’ हा केवळ औपचारिक दिवस नसून विविध भावनांचा मिलाप आहे. आयुष्यात वडिलांनी बजावलेल्या भूमिका समजून घेण्याचा हा दिवस आहे. (When is Father’s Day 2025)
कारण अनेकदा वडील त्यांचे प्रेम आणि काळजी शब्दात व्यक्त करत नाहीत, परंतु त्यांचे प्रत्येक पाऊल मुलांच्या कल्याणासाठी असते, त्यामुळे या दिनानिमित्त का होईना तुमच्यासाठी झटणाऱ्या वडिलांविषयी प्रेम व्यक्त करू शकता.
‘फादर्स डे’ पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला? (Father’s Day 2025: History)
१९१० साली अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे ‘फादर्स डे’ची सुरुवात झाली. वॉशिंग्टनच्या सोनोरा स्मार्ट डोडने तिच्या वडिलांच्या सन्मानासाठी ‘फादर्स डे’ साजरा करण्यास सुरुवात केली. ज्या वडिलांनी तिच्या आईच्या निधनानंतर सहा मुलांना एकट्याने वाढवले, त्याच वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तिने या दिवसाची निवड केली. सोनोराला वाटले की, ज्याप्रमाणे आईसाठी ‘मदर्स डे’ ‘असतो, तसाच वडिलांसाठीही एक दिवस असावा, म्हणून तिने ‘मदर्स डे’प्रमाणे ‘फादर्स डे’ साजरा करण्यास पुढाकार घेतला.
‘फादर्स डे’चे महत्त्व (The Deeper Meaning Behind Father’s Day)
‘फादर्स डे’ आपल्याला आपल्या आयुष्यात वडिलांचे स्थान किती महत्त्वाचे आहे हे समजून घेण्याची संधी देतो. पूर्वी वडिलांकडे कडक शिस्तीचे आणि घरातील कर्ता पुरुष म्हणून पाहिले जात होते. परंतु, आता वडील म्हणजे मुलांचे चांगले मित्र, मदतगार आणि भावनिक आधार होत आहेत. हा दिवस केवळ वडिलांसाठीच नाही तर आजोबा, काका, भाऊ, मामा किंवा शिक्षक यांसारख्या कोणाच्या तरी आयुष्यात वडिलांची भूमिका बजावणाऱ्या सर्वांसाठी आहे. या दिनानिमित्त तुम्हाला वडिलांचे त्याग, परिश्रम आणि अव्यक्त जबाबदाऱ्यांचे महत्त्व समजून घेण्याची आणि त्यांचा आदार करण्याची संधी देतो.
‘फादर्स डे’ कसा साजरा करु शकतो? (How Is Father’s Day Celebrated?)
‘फादर्स डे’ साजरा करण्याची कोणतीही निश्चित पद्धत नाही. तुम्ही तुमच्या वडिलांना एक छोटी भेट देऊन, कार्ड लिहून, त्यांच्याबरोबर वेळ घालवून किंवा खास जेवण बनवून तो साजरा करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही त्यांना ते तुमच्यासाठी किती खास आहेत याची जाणीव करून द्या. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यांच्यासाठी एक सुंदर व्हिडीओ किंवा फोटो कोलाजदेखील बनवू शकता.