Happy Fathers Day 2025 Wishes: प्रत्येकाच्या आयुष्यात आई आणि वडील या दोन्ही शब्दांचं महत्व अनन्यसाधारण असतं. आई जन्म देते, सांभाळ करते, प्रेम देते, सांभाळून घेते म्हणून ती जवळची होते. पण खऱ्या अर्थाने जगणं शिकवणारा असतो तो बाप. आयुष्याच्या प्रत्येक मोठ्या वळणावर आपल्या मुलांचं भलं व्हावं यासाठी खचता खाणारा असतो तो बाप. मुलांच्या मागे खंबीरपणे उभा राहणारा असतो तो बाप. कितीही केलं तरी बापाचं प्रेम हे दुर्लक्षितच राहतं. त्याच्या असण्याने घराला घरपण असतं. आपल्या कडक शब्दांनी मुलांना ओरडणारा बाप त्यांच्यासाठीच दिवसभर खचता खात असतो. त्याची माया उमगायला कठीणच.

ज्या व्यक्तीचा हात पाठीवर असल्यावर कशाचीही भीती नसते, ते फक्त सोबत असावेत असं वाटतं अशा वडिलांना त्यांच्या या आभाळाएवढ्या अस्तित्वाची जाणून करु देऊयात. फादर्स डे निमित्त आपल्या वडिलांना शुभेच्छा देऊयात. आज म्हणजेच १५ जूनला फादर्स डे साजरा केला जाणार आहे. हेच निमित्त साधून तुम्ही तुमच्या वडिलांना शुभेच्छा देण्यापासून या दिवसाची सुरुवात करू शकता..

फादर्स डे शुभेच्छा (Happy Father’s Day Wishes Marathi)

“खिसा रिकामा असूनही त्यांनी कधी नकार दिला नाही
माझ्या वडिलांनपेक्षा श्रीमंत व्यक्ती मी पाहिला नाही.

Happy Fathers Day”

कोडकौतुक वेळप्रसंगी
धाकात ठेवी बाबा..
शांत प्रेमळ कठोर
रागीट बहुरूपी बाबा…

Father’s Day च्या शुभेच्छा!

आपले दुःख मनात लपवून
दुसऱ्यांना सुखी ठेवणारा
एकमेव देवमाणूस म्हणजे वडील

हॅपी फादर्स डे!

जगासाठी तुम्ही एक व्यक्ती
असाल पण माझ्यासाठी माझं
संपूर्ण जग आहात


हॅप्पी फादर्स डे!

कधी शांत, कधी रागीट कधी प्रेमळ, कधी वात्सल्य
कधीही व्यक्त न होणाऱ्या माझ्या लाडक्यांना पप्पांना फादर्स डेच्या मन भरुन शुभेच्छा!

माझ्या प्रत्येक संकटाच्या वेळी एक हात नेहमी माझ्या खांद्यावर होता..
तो कोणी नाही.. माझा लढाऊ बाप होता…
हॅप्पी फादर्स डे!!!

वडिलांसाठी काय स्टेटस ठेवावा..
त्यांच्यामुळेच आज माझं एक स्वत:चं आगळं वेगळं स्टेटस आहे..
हॅप्पी फादर्स डे

भाग्यवान असतात ती लोक
ज्यांच्या डोक्यावर वडिलांचा हात असतो.
इच्छा पूर्ण होतात सर्व
जर वडील त्याच्याबरोबर असतात.
हॅप्पी फादर्स डे!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खरंतर आपले मराठी ‘वडील’ हे व्यक्त होण्याच्या बाबत अनेकदा बॅक फूटला असतात, त्यामुळे तुम्ही फार भाषण द्यायला गेलात तर कदाचित तेच ओशाळले जातील त्यापेक्षा अगदी मोजक्या शब्दात वर दिलेल्या शुभेच्छा Whatsapp स्टेटस, स्टोरी,च्या माध्यमातून शेअर करू शकता. आणि हो शक्य असेल तर बाबांना आवडता एखादा पदार्थ बनवा, बघा अगदी कमी कष्टात पण नक्की तुमचेही वडील खुश होतील.